शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाच्या मृतदेहाचा शोध सुरु; आत्महत्येचे कारणही गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 17:03 IST

महिलेने रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली

आळंदी : आळंदीतील इंद्रायणी नदीत एका महिला पोलिसाने रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने तिच्या एका मित्राला फोन केला असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे.           आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या. रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. मात्र नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली आहे.           अनुष्का केदार पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. मागील दोन दिवसांपासून त्या नोकरीवर गेल्या नव्हत्या. रविवारी सर्वजण घरी होते. दुपारी घरातील सदस्य झोपी गेले असता अनुष्का घरातून बाहेर पडल्या. काही वेळाने घरच्यांना अनुष्का यांनी इंद्रायणी नदीत उडी मारल्याची माहिती मिळाली. अनुष्का यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कुटुंबियांना काहीही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आळंदी पोलिसांकडून आळंदीपासून गोलेगाव पर्यंतच्या हद्दीत शोध घेतला जात आहे. त्यापुढे पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द सुरु होत असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांना शोध घेण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून उजनी धरणापर्यंत असलेल्या पोलीस ठाण्यांना शोध घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.

आळंदी पोलिसांकडून दिवसभर शोध सुरु

मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. रविवारी सायंकाळी आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला पाचारण केले. अंधार पडल्याने रविवारी शोधकार्य थांबवण्यात आले. सोमवारी (दि. २६) पुन्हा आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीindrayaniइंद्रायणीPoliceपोलिसWomenमहिलाriverनदी