शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहशतीचा कोयता आता शाळकरी मुलांच्या हातात! बारामतीत एकावर वार…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:32 IST

३ हल्लेखोर अल्पवयीन मुलांची बाल न्यायालयात रवानगी

सांगवी (बारामती ) : पणदरे (ता.बारामती) येथील विद्यालयात एकमेकांकडे बघण्यावरून अल्पवयीन मुलांच्या दोन गटात वाद झाला होता, तो वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या युवकावर कोयत्याने वार होऊन जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत फिर्यादी निलेश रामदास जगदाळे (वय २१) रा. जगताप आळी पणदरे ता बारामती, जि.पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर तीन अल्पवयीन हल्लेखोर मुलांना माळेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पुण्यातील बाल न्यायालयात रवानगी केली आहे. 

पणदरे (ता.बारामती) येथे हद्दीत काल शनिवार (दि.२५) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निलेश रामदास जगदाळे हे पणदरे येथील नवमहाराष्ट्र विदयालय पणदरे येथील कॉलेज समोरून रस्त्याने जात असताना महाविद्यालयाच्या गेटच्या आत मुलामुलामध्ये भांडण सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी यांनी गेटच्या आतमध्ये जावून पाहिले असता तेथे पणदरे गावातील अल्पवयीन मुलांची एकमेकांकडे पाहण्यावरून भांडण सुरू होते.

अल्पवयीन मुलांची भांडणे मिटवायच्या उद्देशाने सुतगिरणी परिसरात फिर्यादी व इतर अल्पवयीन मुले जमा झाले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने दुसऱ्या बाजूच्या अल्पवयीन मुलाशी भांडणे मिटवताना पुन्हा वाद झाला, या वादातून यातील एका अल्पवयीन मुलाने कोयता घेवुन फिर्यादीच्या अंगावर धावून डोक्यात वार केला असता तो वार फिर्यादीने चुकविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वार फिर्यादीच्या उजव्या खांदयावर बसला, त्यानंतर अल्पवयीन मुलाने दुसरा वार केला असता फिर्यादीने उजव्या हाताने आडविला असता फिर्यादीच्या उजव्या  हाताच्या कोपरास वार लागून गंभीर जखम झाली. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. ३ हल्लेखोर अल्पवयीन मुलांना माळेगाव पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेवून त्यांची रवानगी बाल न्यायालय पुणे येथे केली आहे. उर्वरित हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अमोल खटावकर करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस