शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: वसंत मोरे यांनी भूमिका घेतलेली योग्यच; मी बहिण म्हणून त्यांच्या पाठीशी- रुपाली पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:49 IST

पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून राजकीय अडचण होत असल्याचं म्हटलं.

पुणे- गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत थेट मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या सभेनंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चौफेर हल्ला चढवला. मशिदीवरील भोंगे सरकारने हटवावे अन्यथा आम्ही भोंग्यासमोर दुपटीने लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरेंनी म्हटलं होते.

राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरुन महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीका केली. तसेच पक्षातील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. तर पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून राजकीय अडचण होत असल्याचं म्हटलं. तसेच माझ्या प्रभागात मी भोंगे लावणार नाही. माझ्या प्रभागात शांतता कशी राहील, यासाठी मी प्रयत्न करेन, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. 

वसंत मोरेंच्या या भूमिकेवरुन राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरेंनी भूमिका घेतलेली योग्यच आहे. बहिण म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, असं रुपाली पाटील यांनी सांगितलं. तसेच राज ठाकरेंची सभा ही भाजपाची होती. राज ठाकरेंनी यू-टर्न घेतला आहे. असे होईल हे कोणालाही वाटले नव्हतं, असा टोलाही रुपाली पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 

दरम्यान, राज ठाकरेंची गुढीपाढव्याची जी सभा झाली. त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना मिरच्या झोंबलेल्या देखील बघायला मिळाल्या. त्यामुळे ठाण्यामध्ये ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. 

राज ठाकरेंची ही सभा कशासाठी ठेवण्यात आली आहे, असा काही जणांना प्रश्न पडला असेल. मात्र एखादी मोठी पूजा होते, त्याची सांगता आपण उत्तरपूजेने करतो, असं संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी सांगितले. एखाद्याची आपल्याला उत्तरक्रिया देखील करावी लागते आणि काही लोकांना उत्तरं देखील द्यावी लागतात, असं संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे