शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालखी येण्याच्या मार्गावरच्या रस्त्याची दुरवस्था, चारवेळा भूमिपूजनाचे नारळ फुटले, काम सुरू झालेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:06 IST

- किमान चार वेळा कामाचा केवळ प्रारंभ झालेल्या या ४०० फूट रस्त्याची पालखीपूर्वी तरी डागडुजी होणार की नाही? त्या भागात रोगराईला निमंत्रण देणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न त्या भागातील रहिवाशांच्या मनाला भेडसावतो आहे.

इंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी ज्या रस्त्याने इंदापुरात येते व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जाते, त्या इंदापूर-बारामती राज्यरस्त्यालगत असणाऱ्या शेंडे मळा भागातील रस्त्याची पावसाच्या पाण्यामुळे कमालीची दुरवस्था झाली आहे.

आत्तापर्यंत किमान चार वेळा कामाचा केवळ प्रारंभ झालेल्या या ४०० फूट रस्त्याची पालखीपूर्वी तरी डागडुजी होणार की नाही? त्या भागात रोगराईला निमंत्रण देणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन होईल का, असा प्रश्न त्या भागातील रहिवाशांच्या मनाला भेडसावतो आहे.

इंदापूर-बारामती राज्यरस्त्यालगत श्रीराम वेशीसमोर काही फूट अंतरावर शेंडेमळा आहे. गेल्या बारा वर्षांहून अधिक काळापासून बारामती राज्यरस्त्यापासून शेंडेमळ्यात जाणारा रस्ता वहिवाटीमध्ये आहे. या भागात बऱ्याच अपार्टमेंट झाल्या. एकूण ४०० लोक त्या भागात राहतात. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या वेळी दहा ते पंधरा दिंड्या शेंडेमळ्यात उतरतात. सुमारे ५० गाड्यांतील दोन हजार लोक तेथे मुक्कामास असतात.

शेंडेमळ्यातील हा रहदारीचा रस्ता अद्यापपर्यंत कच्चाच राहिला आहे. कोणतीही निवडणूक आली की, या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा नारळ फुटतो. त्या निवडणुकीच्या निकालानंतर फुटलेल्या नारळाचे कवचच काय, तो फोडणारे नेतेगणदेखील त्यानंतर नजरेला पडत नाहीत. आत्तापर्यंत चार वेळा असा प्रकार घडलेला आहे. त्याला कंटाळून अपरिहार्यता झाल्याने स्थानिक लोकांनी आजपर्यंत स्वखर्चाने त्या रस्त्याची सुधारणा केली आहे.

दोन-अडीच महिन्यांपूर्वी जलवाहिनी टाकण्याच्या नावाखाली नगरपरिषदेने तो रस्ता खोदला. काम झाल्यानंतर लावलिजाव करत बुजवला. मे महिन्याच्या शेवटी पडलेल्या मुसळधार पावसाने तकलादू स्वरूपात बुजवण्यात आलेल्या रस्त्याची पार शकले करून टाकली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक पावसात दुरवस्थेत भरच पडत चाललेली आहे. शेंडेमळ्याच्या वरच्या भागात भर टाकून व्यवस्थित रस्ता बनवण्यात आला आहे. शेंडेमळ्यातील रस्त्याच्या नशिबी मात्र वनवासच लिहिला गेला आहे. रस्त्याची ही कथा आहे. त्याखेरीज या भागात सांडपाणी वाहून नेण्याची सोयही करण्यात आलेली नाही. एका अपार्टमेंटच्या बाजूला हे सारे सांडपाणी साठून राहिलेले आहे. त्यामध्ये डुकरे स्वच्छंदपणे डुंबताना नजरेस पडणे नेहमीचे झाले आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पाचवीला पुजलेली आहे.

येत्या १५ दिवसांमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे. त्या पालखीतील वारकऱ्यांना या ओंगळवाण्या रस्त्याचे दर्शन घेऊन रिंगण सोहळ्यासाठी जावे लागणार आहे. इंदापुरातून पंढरपूरकडे प्रस्थान करताना, डॉ. आंबेडकरनगर भागातून अकलूज रस्त्याकडे जावे लागते. त्या रस्त्याच्या दुतर्फा अस्वच्छता व दुर्गंधी असल्यामुळे पालखीच्या विश्वस्तांनी या रस्त्याने जाणार नाही, त्यासाठी मुक्कामाला इंदापुरात येणार नाही, असा पवित्रा मध्यंतरीच्या काळात घेतला होता. नगरपरिषदेला ‘त्या’ रस्त्याच्या दुतर्फा आच्छादन करून व सुगंधी द्रव्ये फवारून पालखी प्रस्थानाची सोय करावी लागली होती; पण शेंडेमळा व त्याचा रस्ता पालखी येण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर पालखी आगमनापूर्वी तरी नगरपरिषद या रस्त्याची किमान डागडुजी करून सांडपाणी व्यवस्थापनाची सोय करेल का, असा प्रश्न स्थानिकांच्या मनाला भेडसावतो आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी