- विशाल दरगुडे चंदननगर : कल्याणीनगर पोर्चे अपघातानंतर चर्चेत आलेल्या कल्याणीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पब चालविले जात असल्याचे समोर आले. अपघात घडल्यानंतर काही महिने पब बंद होते. आता मात्र पब जोरात सुरू आहेत. राजकीय व पोलिसांचे पाठबळ असल्याने पब चालकांनी कल्याणीनगरचे सर्व रस्ते गिळंकृत केले असून, रस्ते पालिकेचे की पबचे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कल्याणीनगरमध्ये पब, बार अँड रेस्टॉरंट मालकांनी बंगल्यामध्ये व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसायासाठी जागा कमी पडत असल्याने काही जणांनी पार्किंगमध्ये टेबल टाकले आहेत. यामुळे या पबच्या ग्राहकांसाठी व्यावसायिक रस्त्यावर वाहने पार्किंग करीत आहेत. या पबमधील ग्राहक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करतात. या रस्त्यावरील पार्किंगमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावर व्हॅली पार्किंग केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता पालिकेचा अन् ताबा पबचा अशी कल्याणीनगरमधील रस्त्यांची अवस्था आहे.
याबाबत नागरिक आणि सामाजिक संस्थांनी बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा कोंडमारा सहन करावा लागत आहे.कल्याणीनगरमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. या कंपनीतील कर्मचारी जेवणासाठी, नाश्ता करण्यासाठी हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडे येतात. आयटीतील ग्राहकांची संख्या जास्त असल्याने या भागामध्ये छोटे-मोठे हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट आणि पबची संख्या वाढली आहे. कल्याणीनगर येथील कुकू आणि हायलँड हे हॉटेल एका सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये आहेत.
या पबसाठी पार्किंग नाही. हे पब मालक रस्त्यावर ग्राहकांची वाहने व्हॅली पार्किंग करतात. या पबबाहेरील रस्त्यावर त्यांनी ताबा मारला आहे. पबबाहेर असणाऱ्या फुटपाथवरही नागरिकांना चालू देत नाहीत. याप्रमाणेच टांइट हॉटेल व्यावसायिक रात्री सातनंतर दोन वाजेपर्यंत कल्याणीनगर बिशप शाळेच्या दोन्ही रस्त्यावर ग्राहकांची वाहने पार्क करतो.
याप्रमाणे ब्लोअर, इलिफंट आणि इतर हॉटेल व्यावसायिक कल्याणीनगर जॉगर्स पार्क, गणपती मंदिर, कल्याणी बंगला या ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्किंग करतात. या पार्किंगमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. यामुळे कल्याणीनगर येथील मारिप्लेक्स मॉल ते सिल्वर ओक, फोर्टीलिजा सोसायटी, लँडमार्क सोसायटी, जॉगर्स पार्क, या रस्त्यावर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. रात्री उशीरापर्यंत पब सुरु असतात त्यांतून झिंगत येणारे तरुण-तरुणीचे राडे मध्यरात्री रस्त्यावर सुरु असतात त्याचा स्थानिकांना त्रास होतो.
वाहतूक पोलिसांची ठराविक ठिकाणी कारवाई?
कल्याणीनगरमध्ये जवळपास सर्वच रस्त्यांवर पब झाले असून, या पब चालकांनी पूर्वीचे घरांचे स्ट्रक्चरमध्ये बदल करून, तोड मोड करून त्याचे रुपांतर पब मध्ये केले आहे. त्यामुळेच या पबला पार्किंगची सोय नाही, पार्किंग सोय नसल्याने पबमध्ये येणारे ग्राहक सर्रास रस्त्यावर वाहने पार्क करत आहेत. यावर कारवाईची जबाबदारी येरवडा वाहतूक विभागाची असून वाहतूक विभाग फक्त कोरेगाव पार्क ते रामवाडी विमानतळ रस्त्यावर बिशप शाळेपर्यंत कारवाई करत असून, पुढे मोठा पब असून त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. ज्याअंतर्गत रस्त्याच्या ठिकाणी पब आहे त्या ठिकाणी टोइंगची वाहने फिरतदेखील नाही. त्यामुळे येरवडा वाहतूक विभागाच्या कारवाईवर संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी येथे किमान जामर लावून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
धकाम विभागाचे दुर्लक्षइमारतीचे बांधकाम केल्यानंतर प्रत्येक व्यावसायिकाने दुकानासाठी पाकिंगची व्यवस्था केली असती, तर इमारतीच्या बांधकाम नकाशामध्ये तसा आराखडा असतो. पालिकेच्या बांधकाम विभाग या सर्व बाबीची तपासणी केल्यानंतर संबंधित बांधकाम पूर्णत्वाचा नकाशा देते. मात्र, पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर व्यावसायिक पाकिंगमध्ये व्यवसाय सुरू करतात. मात्र, तरी बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करते.स्थानिक नागरिक वैतागलेकल्याणीनगर परिसरातील पब मध्यरात्रीपर्यंत दोन- तीन सुरु असतात पब मधून बाहेर झिंगत येणाऱ्या तरुणाई बऱ्याच वेळा रस्त्यात गोंधळ घालतात त्याचा स्थानिकांना मोठा त्रास होत आहे.