शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बारामतीतील मेंढपाळाच्या मुलीची अभिमानास्पद झेप; देशाचं नेतृत्त्व करणार महाराष्ट्राची लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:55 AM

शेळ्या मेंढ्याच्या बकऱ्यांच्या मागे काठी घेऊन धावणे, काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणे, दगड हातात घेऊन पीचींग करणे, हुंदडण्यात रेश्मा रमत असे.

बारामती तालुक्यातील एका खेड्यातील मेंढपाळाच्या मुलीने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर बेसबॉल संघाच्या कर्णधारपर्यंत आकाशाला गवसणी घातली आहे.तरडोली येथील मेंढपाळ कन्या रेश्मा शिवाजी पुणेकर असे तिचे नाव आहे.सध्या सर्वत्र तिच्याच  संघर्षाचे कौतुक होत आहे. लहानपणापासूनच शेळ्या मेंढ्या राखण्याचे ती काम करीत असे. यावेळी शेळ्या मेंढ्याच्या बकऱ्यांच्या मागे काठी घेऊन धावणे, काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणे, दगड हातात घेऊन पीचींग करणे, हुंदडण्यात रेश्मा रमत असे. पण त्याच काठीच्या आकाराची स्लगर कधी भारतीय संघाची खेळाडू नव्हे तर भारतीय संघाचा कर्णधार बनली आहे.

रेश्मा हिने आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने हे चीन आणि हाँगकाँग देशात खेळले आहेत. तब्बल २३ राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले आहे. २८ राज्यस्तरीय सामने तसेच ४ गोल्ड मेडल, ६ रजत पदक, ३ कास्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करणे तिचे ध्येय होते. हाँगकाँग, चीनसारख्या देशात जाऊन दोनवेळा एशियन स्पर्धा खेळून आलेली रेश्मा पुन्हा एकदा हाँगकाँग देशात होणाºया तिसºया आंतरराष्ट्रीय महिला एशियन कप २०२३ स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे.  

तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पधेर्साठी लागणाºया खचार्साठी तिच्याकडे आर्थिक चणचण आहे. रेश्मा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शारिरीक शिक्षण विभागात एमपीएड या वर्गात शिकत आहे. स्पर्धेमध्ये मिळालेले करंडक, मेडल, प्रमाणपत्र, आदी यशाचा ठेवा  ठेवण्यासाठी तिच्याकडे लाकडी कपाट सुद्धा नाही.आधुनिक उपकरणे, साहित्य तिच्या घरामध्ये नाही. तरी ती जिद्दीने खेळत आहे.रेश्माच्या स्वप्नपूर्तीसाठी तिच्या आई-वडीलांनी सर्व बकऱ्या, रान सुद्धा विकले. फक्त दोन बैलजोडी, काळ्या आईच्या उत्पन्नाच्या आशेवर रात्रीचा दिवस करीत आहेत.

खपणारे आई- वडिल काबाडकष्ट करीत आहेत. परंतु आजही तिची परिस्थिती काळ बनून तिच्यासमोर उभी आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी आर्थिक मदतीची आणि पाठिंब्याची गरज आहे. जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावणाऱ्या रेश्माला येत्या काळात आहार, खेळण्याच्या साहित्यासाठी व इतर खर्च कसा करायचा, हा प्रश्न आवासून उभा आहे. तिला हा खर्च पेलवणारा नाही. त्यामुळे रेश्मा हिच्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.

रेश्मा हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, लहानपणापासुनच खेळाची आवड होती.शाळेत या खेळाची ओळख झाली.आठवीतच न्यु इंग्लीश स्कुलमध्ये  राष्ट्रीय खेळ खेळण्याची सुरवात झाली.अकरावीत शारदाबाई पवार महाविद्यालयात प्रवेश घेतला.महाविद्यालयाने मला चांगला ‘सपोर्ट’ केला. त्या ठीकाणी मोठे मैदान मिळाले.त्यामुळे चांगला सराव घेतला.खासदार सुप्रिया सुळे,कृषि विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार यांची मदत झाल्याचे रेश्मा हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले.आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी मिळण्याची गरज तिने व्यक्त केली आहे.

टॅग्स :BaseballबेसबॉलPuneपुणेSocial Viralसोशल व्हायरल