शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव होईना; दुसऱ्यांदा प्रतिसाद नाही, तिसऱ्यांदा लिलावाची नामुष्की

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 4, 2025 19:56 IST

मालमत्तांच्या मालकांनी आणि लिलावात खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही

पिंपरी : महापालिकेने १ लाखांपुढील मालमत्ता कर थकबाकीदारांच्या निवासी आणि बिगर निवासी अशा ४३ मालमत्तांच्या लिलावाची दोन वेळा प्रक्रिया राबविली. मात्र, दोन्ही वेळा या मालमत्तांच्या मालकांनी आणि लिलावात खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही. त्यामुळे तब्बल २२१ कोटी ५३ लाखांच्या ४३ मालमत्तांसाठी तिसऱ्यांदा लिलाव राबविण्याची महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढावली आहे.

तिसऱ्या लिलावात मालक अथवा मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क न साधल्यास या मालमत्ता नाममात्र बोलीवर महापालिकेकडे जमा करण्यात येणार आहेत. कर संकलन कार्यालयाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून जप्त केल्या आहेत. तरीही मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने त्या मालमत्तांचा दोनवेळा लिलाव जाहीर केला. एकूण ४३ मालमत्तांची यादी कर संकलन विभागाने जानेवारी २०२५ लिलावासाठी वर्तमानपत्रात दुसऱ्यांदा नावे, थकबाकी आणि मालमत्तांचे मूल्यांकन वर्तमानपत्रातून जाहीर केले. यामध्ये २३ निवासी व २० बिगरनिवासी मालमत्ता आहेत. मालमत्ताधारकांकडे १ लाख ते ८ लाखांपर्यंतची थकबाकी आहे. एकाचीही नोंद नाही, तिसऱ्यांदा लिलावाची नामुष्की..लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कर संकलन कार्यालयात ३१ जानेवारीला दुपारी ३ पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करून नावनोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, महापालिका प्रशासनाने दिलेल्या मुदतीत मालमत्ताधारक आणि मालमत्ता लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी एकाही नागरिकाने नावनोंदणी केली नाही. त्यामुळे कर आकारणी व कर संकलन विभाग आता पुन्हा तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया राबविण्याची महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लिलावात मालक अथवा मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क न साधल्यास या मालमत्ता नाममात्र बोलीवर महापालिकेकडे जमा करण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ४३ मालमत्ताधारकांना एक शेवटची संधी म्हणून तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे. लिलाव जाहीर झाल्यापासून २० दिवसांची मुदत देण्यात येईल. या मुदतीत मूळ मालमत्ताधारकाने संपूर्ण थकबाकीसह लिलाव प्रक्रियेचा खर्च जमा केल्यास ती मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात येईल. तसेच तिसऱ्या लिलावालाही प्रतिसाद न आल्यास नाममात्र बोलीवर संबंधित सर्व मालमत्ता महापालिकेकडे जमा करण्यात येणार आहेत. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड