पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत १०० हून अधिक गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीची सुरुवात सकाळी ७ वाजताच करावी, या आपल्या भूमिकेवर ठाम राहून प्रशासनासमोर नवा पेच निर्माण केला आहे. त्यामुळे यावर पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्व मंडळांचे लक्ष लागून आहे. पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. सकाळच्या वेळेत सुरू होणाऱ्या मिरवणुका संपूर्ण दिवसभर सुव्यवस्थित पार पडतात, असा पूर्वानुभव मंडळांकडे आहे. त्यामुळे सकाळी ७ वाजता मिरवणूक सुरू करण्याचा आग्रह केवळ धार्मिक नसून व्यवस्थापनदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याची सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक २९ ते ३० तास लांबत चालली आहे. हे तास कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने जाण्याचा आग्रह धरू नये. लक्ष्मी रस्त्याने आठ गणपती मंडळांना जाऊ द्यावे. शहर वाढले असेल, तर आपण नवे मार्ग सुरू केले पाहिजेत. अशी मागणी मंडळांनी केली होती. आज मंडळांसोबत पोलिसांची बैठक पार पडली. यावेळी मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक दुपारी १२ पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी, इतर मंडळांवरचा ताण कमी होणार, मंडळांची आग्रही भूमिका घेतली आहे.
एक मंडळ एक ढोल पथक करा, गणेश मंडळांची पोलिसांना विनंती केली. मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी मंडळांना मिरवणुकीची परवानगी द्या, मंडळांचे पोलिसांना आवाहन केले. बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता गणेशोत्सव दरम्यान रस्ता सुरू करा अशी मागणी पोलिसांकडे यावेळी करण्यात आली आहे. पुणे शहरातील सर्वच गणेश मंडळांची मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी गणेश मंडळं आग्रही असल्याचे दिसून आले आहे. मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक दुपारी १२ पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी, इतर मंडळांवरचा ताण कमी होणार, मंडळांची आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे. पुण्यातील टिळक रोड वर गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी ८ पासून सुरू होणार आहे. टिळक रोड वरून मार्गस्थ होणाऱ्या गणेश मंडळांचा निर्णय जवळपास निश्चित मंडळांनी सांगितले आहे.