शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: पंतप्रधानांनी टीका-टिप्पणी केली की मते आपल्याकडे येतात; शरद पवार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 20:02 IST

देशात लोकशाही, पण इथं हुकूमशाही आणायचा प्रयत्न होता; तुमच्या शहाणपणामुळे देशातील लोकशाही टिकली

काटेवाडी : देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो हि काय साधी सुधी गोष्ट आहे का, काटेवाडीचा चमत्कार त्यांना कळाला. ते कुठेही गेले की माझ्यावर बोलतात. राज्यात घेतलेल्या १८ सभांमध्ये शरद पवार हा एकच विषय होता. इथुन पुढच्या निवडणुकीत त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे. त्यांनी लक्ष ठेवले टीका-टिप्पणी केली की मते आपल्याकडे येतात, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टोला लगावला.

काटेवाडी येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, निवडणुकीत काही ठिकाणी पैशाचे वाटप झाले असे म्हणतात. खरे खोट माहीत नाही. मागच्या गोष्टी काढायच्या न काढता काम करीत राहायचं. देशात लोकशाही आहे .पण इथे हुकूमशाही आणायचा प्रयत्न होता. पण तुमच्या शहाणपाणामुळे देशातील लोकशाही टिकली. जगात भारताच्या लोकशाहीचा सर्वसामान्यांमुळे नावलाैकीक झाल्याचे पवार यांनी नमुद केले. प्रचाराचा नारळ कन्हेरीत फोडल्यावर सगळ्या निवडणुकीत मला यश आल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. देशात कोठेही गेलो तरी बारामतीचीच चर्चा कानावर होती. मात्र, बारामतीकर साथ सोडणार नाहीत, अस माझ मन मला सांगत होतं. तेच खरे झाले, असे पवार म्हणाले. ऊसाला भाव कसा मिळत नाही, दुधाचे पैसे कसे मिळत नाहीत. हे सगळ बघतो. मला बघण्याचा फार अनुभव असल्याची मिश्कील टीपणी पवार यांनी यावेळी केली. 

....‘छत्रपती’च्या निवडणुकीत शरद पवार घालणार लक्ष

यावेळी पवार यांनी छत्रपती कारखान्याकडे देखील लक्ष वेधले. ते म्हणाले, आप्पा साहेब कारखाना चांगला चालवत होते. कारखाना आता चांगला चालत नाही. कोण मार्गदर्शन करते हे बघावे लागले. आता कारखानदारी नीट करावी लागेल. कारखाना तुमच्या संसाराचा विषय आहे. एक हजार रुपये शेतकऱ्यांना कमी मिळतातं. तो कारखाना आता ताब्यात घ्यायचा. छत्रपती एक नंबर चा कारखाना शेवट नंबर ला गेला. त्यात दुरुस्ती करायची असल्याने यासाठी तुमची गरज  आहे,अशा शब्दात आगामी छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले.

आजचा दिवस माझ्या लक्षात राहणारा दिवस आहे. काटेवाडी गावात चौथी पर्यत माझं शिक्षण इथे झालं. शाळेत वाघमारे नावाचे मास्तर होते. शनिवार आणि रविवारी सुट्टीचा दिवस होता. तेव्हा आमची आई गुरे घेऊन पाठवायची. तो दिवस आजही मला आठवतो, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सत्तेचा वापर लोकांच्या आयुष्यात चांगला बदल करायचा असतो, ही शिकवण मला यशवंतराव चव्हाण यांनी दिली. त्यावाटेने जात असल्याचे पवार यांनी नमुद केले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण