शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

पुण्यात तरुणाचा पराक्रम! दारूच्या नशेत चढला थेट विद्युत वाहिनीच्या टॉवरवर, पोलिसांचे अथक प्रयत्नही अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 12:13 IST

तरुण तब्बल १२ तासांहून अधिक वेळ तो टॉवरच्या टोकावर बसून होता

आळंदी : आळंदी शहरालगतच्या केळगाव (ता. खेड) हद्दीत एक तरुण दारूच्या नशेत थेट उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरवर चढला. विशेष म्हणजे तब्बल १२ तासांहून अधिक वेळ तो टॉवरच्या टोकावर बसून होता. तर  त्यादरम्यान त्याचे मनपरिवर्तन करताना पोलिस, वीज वितरण कंपनी व स्थानिकांच्या नाकीनऊ आले. सुदैवाने त्याला विजेचा शॉक बसला नाही. दरम्यान रविवारी (दि.२०) सकाळी आठच्या सुमारास संबंधित इसमाला विद्युत वाहिनीच्या टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले.

किशोर दगडोबा पैठणे (वय ३० वर्षे सध्या रा. वाघोली पुणे, मूळ रा. मेळा बुद्रुक ता. चिखली जि. बुलढाणा) हा दारूच्या नशेत शनिवारी (दि.१९) रात्री केळगाव हद्दीतील उच्च दाब विद्युत वाहिनी टॉवरच्या टोकावर चढून बसला. स्थानिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित तरूणाला टॉवरवरून खाली उतरविण्याची विनंती केली. मात्र तो काही केल्या खाली येईना. त्यानंतर पोलिसांनी विद्युत वीज महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पाचारण केले. सलग चार - पाच तास त्याला खाली उतरविण्यासाठी अथक प्रयत्न करूनही तो काही येईना. अक्षरशः त्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्र जागून काढली.                दरम्यान आज (दि.२०) सकाळी आठच्या सुमारास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस कर्मचारी, अग्निशम दलाचे लिडिंग फायर अधिकारी भाऊसाहेब धराडे व त्यांचा स्टाफ, विद्युत वहिनी देखभाल विभाग पिंपरी चिंचवड अतिरिक्त अधिकारी गिरीश पंतोजी व त्यांचा स्टाफ तसेच पोलीस मित्र, रुग्णवाहिका असा ताफा बोलाविण्यात आला. सर्वांच्या मदतीने संबंधित तरुणाचे मनपरिवर्तन करून त्याला खाली उतरविण्यात प्रशासनाला यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सदर इसमास आळंदी पोलिसांनी दवाखान्यात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्याची आई लता दगडोबा पैठने यांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. 

टॅग्स :AlandiआळंदीelectricityवीजmahavitaranमहावितरणPoliceपोलिस