शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अवकाळीचे पंचनामे अपूर्णच; अजून किती दिवस बळीराजानं वाट बघावी

By नितीन चौधरी | Updated: December 26, 2023 10:50 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करावेत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड

पुणे : राज्यात नोव्हेंबरअखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पंचनामे केव्हा पूर्ण होतील आणि मदत केव्हा मिळेल, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार पंचनाम्यांचे काम सुमारे ९५ टक्के पूर्ण झाले आहे.

राज्यात २४ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे कोकण वगळता बहुतांश जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार ७ लाख ८८ हजार १०१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मदत पुनर्वसन विभागाने कृषी विभागाला दिले. पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करावेत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही हे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अंतिम आकडा निश्चित झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वाधिक नुकसान बुलढाण्यात

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वाधिक १ लाख २८ हजार २०१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झाले आहे. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २६ हजार ४३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर अमरावती जिल्ह्यातही १ लाख १५ हजार ४९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

ऑक्टोबरपर्यंत मदत जाहीर

दरम्यान, नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता १७५७ कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून, त्यापैकी ३०० कोटींपेक्षा जास्तीचे वाटपदेखील झाले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार एकूण बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ठाणे ९१, पालघर १५८९, रत्नागिरी ८८, सिंधुदुर्ग १, नाशिक ३३३८८, धुळे २९४, नंदुरबार २८८७, जळगाव ९०५, नगर १५३०७, पुणे ७८६४, सोलापूर २९७७६, सातारा १५, सांगली १६५५९, छत्रपती संभाजीनगर ४५७८३, जालना ७६८०३, बीड २१५, धाराशिव २०६८, हिंगोली ७९४०२, परभणी १०००, नांदेड ३००३, लातूर २४६, बुलढाणा १२८२०१, अकोला ६३८६१, वाशिम ९९६१, यवतमाळ १२६४३८, अमरावती ११५०४९, गडचिरोली ३०, वर्धा ५८३, नागपूर १९७६, भंडारा ८६०८, गोंदिया २७७५, चंद्रपूर १३३३५ एकूण ७८८१०१.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारEknath Shindeएकनाथ शिंदेRainपाऊसMONEYपैसा