कुत्र्याची वाहनावर लघूशंका, जाब विचारताच मालकाने चैनने मारले; चिंचवडमधील घटना

By प्रकाश गायकर | Updated: March 22, 2024 17:45 IST2024-03-22T17:45:37+5:302024-03-22T17:45:53+5:30

ही घटना गुरूवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता चिंचवड येथे घडली....

The owner chained the dog to the vehicle when he asked for it; Incident in Chinchwad | कुत्र्याची वाहनावर लघूशंका, जाब विचारताच मालकाने चैनने मारले; चिंचवडमधील घटना

कुत्र्याची वाहनावर लघूशंका, जाब विचारताच मालकाने चैनने मारले; चिंचवडमधील घटना

पिंपरी : वाहनावर एका कुत्र्याने लघुशंका केली. याबाबत कुत्र्याच्या मालकाला विचारणा केली असता मालकाने कुत्र्याच्या गळ्यातील लोखंडी चैनने मारहाण केली. ही घटना गुरूवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी अतुल गुलाब लोंढे (वय ३६, रा. डांगेचौक रोड, वाकड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धनंजय कालीदास यादव व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाहनामध्ये बसले असताना त्याठिकाणी एक कुत्रे आले. त्या कुत्र्याने वाहनावर लघुशंका केली. याबाबत फिर्यादी यांनी कुत्र्याच्या मालकाला विचारणा केली. त्याचा राग येऊन कुत्र्याच्या मालकाने शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील कुत्र्याच्या गळ्यातील लोखंडी चैनच्या हुकाने फिर्यादीच्या डोक्यात मारत जखमी केले. तसेच संशयित महिला आरोपीनेही फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

Web Title: The owner chained the dog to the vehicle when he asked for it; Incident in Chinchwad