शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

उदघाटन थाटात मात्र वर्ष होऊनही धावली नाही; पुणे मेट्रोच्या विलंबाला भाजपच जबाबदार

By राजू इनामदार | Updated: June 6, 2023 15:16 IST

भाजप पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार करतंय, काँगेसचा आरोप

पुणे: मेट्रो चे थाटात उदघाटन केले, मात्र आता त्याला वर्ष होऊन गेले तरीही मेट्रोची धाव एक इंचही पुढे गेलेली नाही. या विलंबाला भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेतेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला. सरकारमध्ये नियोजनाचा अभाव असल्यानेच हे होत असून हा तर पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

मागील वर्षी ६ मार्चला पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे या ५ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी मेट्रोचे अधिकारी आत्ताच उदघाटन नको असे सांगत असतानाही महापालिका निवडणूक जाहीर होईल या शक्यतेने स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी उदघाटनाचा घाट घातला अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. त्यानंतर वर्ष झाले, आताचा मार्चही गेला पण अद्याप गरवारे महाविद्यालयाच्या पुढील मेट्रो मार्ग सुरू झालेला नाही. उलट वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील ५ स्थानकांचे काम अजूनही अपूरेच आहे. लिफ्टसह अनेक कामे अजूनही सुरूच असल्याचे जोशी म्हणाले.

यामुळे मेट्रो मार्गाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावरील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. सलग ४ वर्षे हे काम सुरू आहे. आतापर्यंत काम पूर्ण होऊन संपूर्ण मेट्रो स्थानकांसहित सुरू होणे गरजेचे होते. कोरोनाचा ८ महिन्यांचा कालावधी जमेस धरला तरीही मेट्रोच्या कामाला विलंबच होत आहे. पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी हा एक प्रकारचा खेळच आहे व स्थानिक भाजप पदाधिकारी तो करत आहे असा आरोप जोशी यांनी केला.मेट्रो त्वरीत पूर्ण क्षमतेने, संपूर्ण मार्गावर सुरू होणे ही पुण्याची आजची सर्वात महत्वाची गरज आहे. मात्र परत एकदा भव्य उदघाटन करण्याचा स्थानिक भाजपचा विचार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची धडपड पुणेकरांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांकडेच तक्रार करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. वनाज ते गरवारे हा मेट्रो मार्ग सुरू करण्याची घाई केली त्याप्रमाणेच आता संपूर्ण मेट्रो मार्गही तत्काळ सुरू करावा, उदघाटनाच्या फंदात पडू नये अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीBJPभाजपाcongressकाँग्रेस