बारामती लोकसभेचा पुढचा खासदार भाजपाचाच होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 21:20 IST2022-09-06T21:18:42+5:302022-09-06T21:20:01+5:30
काटेवाडी: राष्ट्र निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करून २०२४ चा पुढचा खासदार भाजपचाच ...

बारामती लोकसभेचा पुढचा खासदार भाजपाचाच होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार
काटेवाडी: राष्ट्र निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करून २०२४ चा पुढचा खासदार भाजपचाच होणार आहे, असे सुतोवाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काटेवाडी गावात आयोजित केलेल्या बुथ कमिटी आढावा बैठकीत ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पुढे म्हणाले की, भाजपने आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी बुथ कमिटीला मार्गदर्शन केले. मनपरिवर्तन करण्यासाठी त्यांनी कानमंत्रही दिला. आपल्या तोंडावरील मास्क बारामतीने काढला नाही तर तो मास्क प्रंतप्रधान मोदींनी काढला. परकीयांचे आक्रमक धुडकावण्यासाठी प्रंतप्रधान मोदी सक्षम आहे. देशात चांगले किल्ले ढासळले आहेत फक्त बारामती मतदारसंघ राहिला आहे. यासाठी मतदारांचे मनपरिवर्तन करणे गरजेचे आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला. इथल्या कार्यकर्त्यांला अधिकाऱ्यांचा त्रास होत असेल तर फडणवीस यांच्या कानावर घालणार आणि कार्यकर्त्यांचा त्रास दूर करणार, असंही बावनकुळे म्हणाले. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कन्हेेेेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.
यावेळी भारतीय जनता पार्टी काटेवाडी शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी केले यावेळीमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जालिंदर भेगडे, वासुदेव काळे, रंजन तावरे, उपस्थित होते .