शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप

By राजू इनामदार | Updated: June 9, 2025 15:36 IST

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे, सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती

पुणे: पक्षीय बैठकीसाठी म्हणून सोमवारी पुण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मुंब्रा येथे आजच सकाळी झालेल्या लोकल अपघातावरूनरेल्वे प्रशासन, रेल्वे मंत्रालय यांच्याबरोबरच पत्रकारांवरही टीकास्त्र सोडले. परप्रातांमधून मुुंबईत जोर येऊन आदळणारे लोंढेच या सगळ्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचे मत त्यांना व्यक्त केले. रेल्वे प्रशासन,रेल्वे मंत्रालय व पत्रकारांवरही त्यांनी टिकास्त्र सोडले

मुंबईची लोकल चालते कशी हे जगाला आश्चर्यच असल्याचे उपरोधिकपणे सांगत त्यांनी राज उद्धव एकत्र कधी येणार या बातम्यांऐवजी या दुरवस्थेकडे थोडे लक्ष द्या असे पत्रकारांनाही सुनावले. आपण वारंवार शहराच्या दुरवस्थेविषयी बोलतो, मात्र त्याला कधीही महत्व दिले जात नाही. आम्ही एकत्र कधी येणार याच्या बातम्यांना जेवढा वेळ दिला तेवढा वेळ आता या अपघातात मृत्यूमूखी पडलेल्यांना देणार का असा प्रश्न राज यांनी केला.

रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत लोकलमध्ये लोक येतात कुठून जातात कुठून काहीही कळत नाही. याची व्यवस्था लावण्यासाठी मुंबईतील लोकांनी रेल्वे मंत्रालयाला एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करा असे सांगितले होते, त्याचे काय झाले कोणालाही माहिती नाही. मेट्रो बांधताहेत, पुल बांधताहेत, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली उंचच उंच इमारती उभ्या रहात आहेत. या सगळ्यांना वाहनतळ नाही, पण त्याविषयीही कोणीही बोलत नाही. पुणे मुंबई ठाणे अशा शहरांमध्ये कुठे आत आग लागली तर तिथे फायरब्रिगेडची गाडीही जाऊ शकत नाही.

शहरांचे नियोजन नावाची गोष्टच आपल्याकडे नसल्याबाबतही मी अनेकदा बोलतो, मुलाखतींमध्ये सांगतो, मात्र त्याला महत्व दिले जात नाही. आमच्या एकत्रिकरणाच्या बातम्या लावल्या जातात. प्रश्न वेगळेच आहेत. मेट्रो, उड्डाणपूल करून नव्या खासगी वाहनांच्या नोंदी होणे थांबले आहे का? नाही थांबलेले. मग हे पूल, मेट्रो, रस्ते वापरते तरी कोण? कधीतरी याचा विचार केला जाणार आहे की नाही असा वैताग राज यांनी व्यक्त केला. मुंबईत एकही दिवस असा जात नाही की रेल्वेचा अपघात झाला नाही. अपघात झाला की रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा कसला देताय, तिथे जा, बघा काय झालेय. ते सुधारण्याचा प्रयत्न करा, पण ते आपल्याकडे होतच नाही असे राज म्हणाले.

माणसाच्या जीवाची आपल्याकडे किंमत नाही हेच खरे आहे. सगळे मंत्री, मोठे अधिकारी परदेशात पाहणीसाठी वगैरे जातात. ते काय पाहतात त्यांनाच माहिती. तिकडची रेल्वे इकडे आणू नका, पण ते ती चालवतात कशी? त्यांच्याकडे अपघात का होत नाहीत? यामगचा जो विचार आहे तो तरी इकडे घेऊन या, त्याप्रमाणे काम करा. पण तेही काम होत नाही. केंद्र सरकारने, रेल्वे मंत्रालयाने या गोष्टीकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे असे मत राज यांनी व्यक्त केले. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, प्रदेश प्रवक्ते योगेश खैरे तसेच मनसेचे अन्य स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज यांनी घेत काही सुचना दिल्या असल्याचे समजते.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेrailwayरेल्वेMumbaiमुंबईAccidentअपघातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार