छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यविधीचा उल्लेख काल्पनिक; कुठल्याही ऐतिहासिक दस्तात नोंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 07:03 IST2026-03-08T07:02:55+5:302026-03-08T07:03:11+5:30

चौकशी आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली

The mention of Chhatrapati Sambhaji Maharaj's funeral is fictional; there is no record of it in any historical document. | छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यविधीचा उल्लेख काल्पनिक; कुठल्याही ऐतिहासिक दस्तात नोंद नाही

छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यविधीचा उल्लेख काल्पनिक; कुठल्याही ऐतिहासिक दस्तात नोंद नाही

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यविधीबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तात उल्लेख नाही, असे संमेलनाध्यक्ष व माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उलटतपासणीदरम्यान मान्य केल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर विश्वास पाटील यांची उलटतपासणी पुणे येथे शुक्रवारी घेतली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘संभाजी’ या कादंबरीमधील संभाजी महाराजांच्या अंत्यविधीविषयक कथनावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाले व काही गटांनी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केला, अशी भूमिका घेऊन दोन समुदायांत वाद निर्माण करायचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव, जि. पुणे येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या दंगलीच्या संदर्भात पुणे येथे चौकशी सुरू आहे. 

याप्रसंगी उलट तपासणीदरम्यान विश्वास पाटील यांनी मान्य केले की, संभाजी महाराज यांच्या अंत्यविधीबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तात उल्लेख नाही आणि ‘संभाजी’ या कादंबरीमधील उल्लेख पूर्णतः काल्पनिक असून, दामाजी पाटील, पाटलीन हे उल्लेख पूर्णतः काल्पनिक आहेत, असे त्यांना विचारलेल्या प्रश्नांदरम्यान सांगितल्याचे हिरे यांनी नमूद केले. दरम्यान, कांदबरीतील लिखाणाचा गैरवापर करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते निषेधार्थ आहे, असेही पाटील यांनी उलटतपासणीवेळी सांगितल्याचे ॲड हिरे यांनी स्पष्ट केले. 

Web Title : संभाजी महाराज का अंतिम संस्कार: कोई ऐतिहासिक रिकॉर्ड नहीं, काल्पनिक: पाटिल

Web Summary : विश्वास पाटिल ने कोरेगांव भीमा आयोग के सामने स्वीकार किया कि संभाजी महाराज के अंतिम संस्कार का कोई ऐतिहासिक रिकॉर्ड नहीं है। उपन्यास का विवरण काल्पनिक है, जिससे संभावित रूप से सांप्रदायिक तनाव बढ़ सकता है।

Web Title : Sambhaji Maharaj's funeral: No historical record, purely fictional, says Patil.

Web Summary : Vishwas Patil admitted to Koregaon Bhima Commission that there's no historical record of Sambhaji Maharaj's funeral. The novel's account is fictional, potentially fueling community tensions, he stated.