पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. तर काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातंर्गत संषर्घ करावा लागणार आहे. अनेक प्रभागामध्ये खुली जागा एकच असल्यामुळे दिग्गज माजी नगरसेवकांना एकमेकांसमोर उभे राहवे लागणार आहे. आरक्षण सोडतीमुळे कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठींची ही डोकेदुखी वाढणार आहे. अशातच पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने महापौर आमचाच असल्याचा दावा केला आहे. तसेच पुण्यात सर्व प्रभागांत चांगले उमेदवार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत. महायुतीच्या कुठल्या पक्षासोबत आमची युती होणार नाही, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही लढाई लढली आहे. आमची आघाडी महाविकास आघाडीसोबत होणार आहे. पुणे शहराचे महायुतीने वाटोळे केले. महायुतीच्या कुठल्याच पक्षासोबत युती करण्याचा आमचा विचार नाही. मनसेला सोबत घेण्याचा निर्णय माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार घेणार असल्याचे ते म्हणाले आहेत. कोल्हापूरमध्ये फक्त चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर आमच्या कार्यकर्त्यामध्ये चर्चा नाही. पुण्यात सर्व प्रभागांत चांगले उमेदवार मिळणार आहेत. आमच्याकडे पण लवकरच इनकमिंग होणार आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा महापौर होईल, असे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.
Web Summary : NCP (Sharad Pawar Group) confidently asserts their party will secure Pune's mayoral position in upcoming elections. They plan to contest with Mahavikas Aghadi, rejecting alliances with Mahayuti. The party expects strong candidates in all wards, anticipating new members soon.
Web Summary : राकांपा (शरद पवार गुट) ने विश्वासपूर्वक कहा कि आगामी चुनावों में पुणे के महापौर का पद उनकी पार्टी हासिल करेगी। उन्होंने महायुति के साथ गठबंधन को खारिज करते हुए महाविकास अघाड़ी के साथ चुनाव लड़ने की योजना बनाई है। पार्टी को सभी वार्डों में मजबूत उम्मीदवारों की उम्मीद है, और जल्द ही नए सदस्यों के आने की आशा है।