शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
5
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
6
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
7
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
8
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
9
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
10
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
11
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
12
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
13
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
14
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
15
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
16
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
17
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
18
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
19
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
20
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचे आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे; रामदास आठवले यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 20:44 IST

महायुती लोकशाही आघाडी सध्या सर्वत्र विजय मिळवत असून या विजयात रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे

पुणे: महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या सर्वत्र विजय मिळवत आहे. या विजयात रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. मते कशी मिळवायाची याचे टेक्निक आम्हाला मिळाले आहे. गोरगरीबांना पैसे देतो आणि नैतिक दृष्ट्या योग्य आहे म्हणून आम्ही निवडून आलो. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगले यश मिळेल. लोणावळ्यामध्ये आरपीआयला अध्यक्षपद दिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांनी सांगून नगराध्यक्षपद देतो म्हटले, मात्र दिले नाही. महायुतीचे रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

बंडखोरीचे प्रमाणही अधिक

दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांच्या युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरी देखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी विधाने घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत, असे आवाहनही आठवले यांनी केले.

अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून आता चौथ्या क्रमांकावर आली

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही मृतावस्थेत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर असताना भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. ती आता चौथ्या क्रमांकावर आली आहे. लवकरच की तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. याचे श्रेय निश्चितपणे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे आहे, असेही आठवले म्हणाले.

 योजना राबवणे हा आमचा अधिकार

सध्याच्या निवडणुका पैशाच्या आधारावर लढवल्या जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाचा आठवले यांनी समाचार घेतला. गोरगरिबांना उपयुक्त ठरणाऱ्या योजना राबवणे हा आमचा अधिकार आहे आणि ते आमचे कर्तव्य देखील आहेत. विरोधकांकडे सत्ता असताना त्यांना अशा योजना राबवता आल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance neglects us, laments Ramdas Athawale about Maharashtra coalition.

Web Summary : Ramdas Athawale expressed dissatisfaction over the coalition's neglect towards the Republican Party. He highlighted contributions to victories and criticized the failure to honor commitments in Lonavala. He defended the government's economic policies, refuted claims of a failing economy, and justified welfare programs.
टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणMahayutiमहायुती