शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

Narendra Modi: जुन्या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्रासह देशाचं नुकसान; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 14:03 IST

जुनं सरकार ८ वर्षात एका एक पिलर उभारू शकले नाहीत, आमच्या महायुती सरकारने पुण्यात मेट्रो आणली

पुणे: जुन्या सरकराची कार्यपद्धती देशाला मागे घेऊन जाणारी होती. ती कार्यपद्धती आम्ही ती बदलून देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहोत. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे लोकार्पण कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.  

मोदी म्हणाले, महिलांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. म्हणून आम्ही महिलांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळेया प्रकारे प्रयत्न करत आहोत. विकासाबरोबर वारसाही जपणायचा आमचा प्रयत्न असल्याने सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज केले आहे. पुण्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले,  पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने सर्व सोयी सुविधा वाढल्या पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजे. आता सुरु झालेला पुण्याचा विकास खूप आधी होणं अपेक्षित होत पण तस झालं नाही. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्याची फाईल तयार झाली तरी धूळखात पडून होती. २००८ साली मेट्रोची चर्चा सुरु झाली. पण आमच्या सरकारच्या काळात मेट्रो प्रत्यक्षपणे धावण्यास सुरुवात झाली.  जुनं सरकार ८ वर्षात एका एक पिलर उभारू शकले नाहीत. आमच्या महायुती सरकारने पुण्यात मेट्रो आणली. महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार चांगलं काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती 

पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती, समाजभक्ती आहे. मी दोन दिवसापूर्वी पावसामुळे पुण्यात येऊ शकलो नाही. पुण्याच्या पावनभूमीला माझा स्प्रश्य न झाल्याने मी स्वतःचे नुकसान झाल्याचे समजत आहे. पण आज मेट्रोचे ऑनलाईन उदघाटन होतंय याचा मला खूप आनंद आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढायला हवी असही त्यांनी सांगितलं आहे. 

हिरवा झेंडा दाखवून मेट्रो सुरु 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. आजपासून ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असे मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसMetroमेट्रो