शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

‘लोकमत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’ ॲवार्डने राज्यातील इन्फ्लुएन्सरचा शनिवारी होणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:20 IST

कोलते-पाटील ग्रुप प्रस्तुत, लोकमान्य सोसायटी व सूर्यदत्ता ग्रुपचा सहयोग

पुणे : जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आज सोशल मीडिया अग्रस्थानी आहे. त्यामुळेच सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचे महत्त्व वाढते आहे. सोशल मीडियाचा कल्पकतेने वापर करून नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सचा कोलते-पाटील ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर’ लोकमान्य सोसायटी आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहयोगाने सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा उद्या (ता. २९) कल्याणीनगर येथील हयात हॉटेलमध्ये रंगणार आहे. 

‘पत्रकारिता परमोधर्म:’ या तत्त्वानुसार लोकजीवन अधिक सुखकर बनवण्यासाठी झटणाऱ्या लोकमत ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पुरस्कारांसाठीचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरात चर्चा असलेल्या या पुरस्कारासाठी राज्यभरातून हजारो नॉमिनेशन्स आली होती. त्यातून तज्ज्ञ ज्युरींनी कन्टेन्ट, प्रभाव, विविध घटकांचा अभ्यास करून अंतिम विजेत्यांची निवड केली आहे. या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश, कोलते पाटील ग्रुपचे सीईओ राहुल तालेले, डिजिटल क्रिएटर सौरभ घाडगे, करण सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  या कार्यक्रमासाठी गुड लाईफ पार्टनर, फिनिक्स मॅाल असून ड्रिव्हन बाय क्वीन्स राॅयल रायडर्स (राॅयल एनफिल्ड) हे आहेत. 

राज्यातील  हा अशाप्रकारचा पहिलाच पुरस्कार सोहळा असल्याने सोशल मी़डिया क्षेत्रातील दिग्गजांमध्ये याविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे. सोशल मीडियाच्या क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेता या क्षेत्रातील सकारात्मक, दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण प्रयोग  करणाऱ्या इन्फ्लुएर्न्सला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्याचीच सुरवात लोकमतच्या या पुरस्कार सोहळ्याद्वारे होत आहे. 

नवी क्रांती घडेल, असा विश्वास

कोलते-पाटील ग्रुप ‘लोकमत’च्या सगळ्याच उपक्रमात नियमितपणे सहभागी होत असतो. महाराष्ट्रातल्या या पहिल्याच पुरस्कारामुळे सोशल मीडियाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडेल, असा विश्वास आहे. - राहुल कलोले, सीईओ, कोलते पाटील ग्रुप

‘लोकमत’ नेहमी नावीन्याच्या शोधात

‘लोकमत’ नेहमी नावीन्याच्या शोधात असते. अशा पुरस्कारांमुळे नव्या क्षेत्रातील नव्या टॅलेंटला वाव आणि प्रोत्साहन मिळते. या पुरस्कारासोबत ‘लोकमान्य’चे नाव जोडताना त्यामुळेच विशेष आनंद होत आहे. - सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी लि.

सोशल मीडियात काम करणाऱ्या नवोदितांना मोठी संधी 

विद्यार्थ्यांनी नवी कौशल्ये आत्मसात करावीत आणि त्यात नव्या संधी शोधून स्वत:ला सिद्ध करावे, असा आमचा नेहमी प्रयत्न असतो. या पुरस्कारामुळे सोशल मीडियात काम करणाऱ्या नवोदितांना मोठी संधी मिळेल.- - डॉ. संजय चोरडिया, संस्थापक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

हजारो जणांचे नॉमिनेशन

-‘लोकमत सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर’ पुरस्कारासाठी हजारो जणांनी नॉमिनेशन केले होते. यामध्ये फूड, ट्रॅव्हल, फॅशन, मोटिव्हेशनल यासारख्या ३० कॅटेगरी होत्या. - ओरिजनल कंटेट, फॉलोअर्स, कॉमेंट, लाइक्स, व्ह्यूज या निकषांच्या आधारे ही निवड करायची होती. - अंतिम निवड करणे हे खरोखरच दिव्य होते; परंतु अनेक तास सलग चर्चा, फेसबुक, इन्स्टाग्राम, यू- ट्यूबवरील कंटेन्ट पाहून ३० विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील तज्ज्ञ ज्युरींकडून निवड

या कार्यक्रमासाठी करिश्मा मेहता, ह्युमन्स ऑफ बॉम्बे, आयपीएस कृष्ण प्रकाश, मधुराज रेसिपीजच्या मधुरा बाचल, नागपूरचे लेखक निखिल चंदवानी यांनी या पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून काम पाहिले.

कधी - शनिवार, दि. २९ जुलै

कुठे - हॉटेल हयात, कल्याणीनगर, पुणे.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाLokmatलोकमतhotelहॉटेलSocialसामाजिक