शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

शपथविधीला जाण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:15 IST

महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेसेना पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.

पुणे : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. त्यासाठी शहरातील महायुतीचे सर्व शहर, प्रदेश आणि राष्ट्रीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यासाठी उद्या मुंबईला जाणार आहेत. त्यासाठी महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेसेना पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.भाजप विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उद्या मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी खास गाड्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपचे पुणे शहर आणि प्रदेश पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख कार्यकर्ते, याप्रमाणे सुमारे ५०० जण या शपथविधी कार्यक्रमासाठी जाणार आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते असे मिळून सुमारे ५०० हून अधिक कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. शहरातही जल्लोष साजरा केला जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले.शिंदेसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक हे उद्या मुंबईला शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ४०० ते ५०० कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधीला जाण्यासाठी निघणार आहे, असे शिंदेसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले.श्रीराम चौकात जल्लोष करणारराज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे. उद्या शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी महंमदवाडीतील हांडे रोडवरील श्रीराम चौकात या शपथविधीचा जल्लोष केला जाणार आहे, असे शिंदेसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले. पुण्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यासाठी उद्या मुंबईमध्ये जाणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाcollectorजिल्हाधिकारीMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवार