शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जातीय समीकरणातून भरणेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:54 IST

पक्षाशी एकनिष्ठ, विकासकामे व जातीय समीकरणात भरणेंनी बाजी मारली असून, माजी मंत्री पाटील यांना मोठा शह मानला जात आहे

- सतीश सांगळेकळस : सर्वसामान्य माणसांशी असलेली नाळ व विकासकामांच्या जोरावर तिसऱ्यांदा विजय खेचून आणल्यानंतर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद देताना जातीय समीकरण साधलं आहे. आमदार दत्तात्रय भरणे धनगर समाजाचे नेते असून, राज्यातील धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे पक्षाला मोठा फायदा होणार आहे. पक्षाशी एकनिष्ठ, विकासकामे व जातीय समीकरणात भरणेंनी बाजी मारली असून, माजी मंत्री पाटील यांना मोठा शह मानला जात आहे.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या आमदार दत्तात्रय भरणे यांनी कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कारखान्याचे संचालक ते अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक ते अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य ते अध्यक्ष, आमदार ते मंत्री असा राजकीय आलेख नेहमीच चढता राहिला. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या हायहोल्टेज अटीतटीच्या लढतीत भरणे यांनी विकासकामांच्या जोरावर संयम बाळगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव करून विकासकामांच्या जिवावर विजय संपादन केला. भरणे यांनी दहा वर्षांच्या कालावधीत आमदार व मंत्री म्हणून केलेली विकासकामे यामुळे सर्वसामान्य जनता पाठीशी उभी राहिली.तालुक्यात सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ भरणे यांनी कधीच तोडली नाही जनतेच्या सुख-दुःखात व अडीअडचणीच्या काळात त्यांनी नेहमीच मोलाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर आमदार भरणे यांनी अजित पवारांवर विश्वास ठेवत पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. तसेच तालुक्यात सुमारे सहा हजार कोटींचा विकास निधी आणून सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला. पक्षाशी एकनिष्ठपणा, विकासकामे व जातीय समीकरणे भरणेंना कॅबिनेट मंत्रिपदाची मजल मिळाली आहे. पाटलांना शह  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांच्यात फारसे सख्य नाही. गेली ३० वर्षे त्यांच्यात अंतर्गत वाद राहिला आहे. त्यामुळे भरणे यांना राजकीय ताकद देऊन पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMahayutiमहायुती