शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भंगार विक्रेत्याचा पराक्रम; तब्बल साडेबारा कोटींचा GST बुडविला, पुण्यातील खळबळजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:59 IST

भंगार विक्रेत्या व्यापाऱ्याला पुणे जीएसटी विभागाने थेट उत्तर प्रदेशातून अटक

पुणे : अनेक बोगस कंपन्यांकडून तब्बल ७० कोटी २२ लाखांची खरेदी बिले घेऊन शासनाचा कोट्यवधींचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाऱ्या एका भंगार विक्रेत्या व्यापाऱ्याला पुणेजीएसटी विभागाने थेट उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या विभागाने अशा प्रकारे परराज्यात जाऊन केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

सिराजुद्दीन कमालुद्दीन चौधरी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. चौधरी याची ‘ओलायन डेस्कॉन इंडस्ट्रीयल’ कंपनी आहे. त्याने बनावट बिले सादर करून १२ कोटी ५९ लाखांचा जीएसटी कर बुडविला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुणे शहर सोडून फरार झाला होता. जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागाने विशेष शोधमोहीम राबवली. तो उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी गेला असल्याची शक्यता लक्षात घेऊन एक पथक सिद्धार्थनगर जिल्ह्यातील जबजुआ गावी रवाना झाले. तेथे चौधरी याच्या घरावर ३ दिवस पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. पुण्यात आणून त्याला न्यायालयासमोर हजर केले. ॲड. महेश झंवर यांनी काम पाहिले. न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई अपर राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे, राज्य कर सहआयुक्त दीपक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर उपायुक्त मनीषा गोपाळे-भोईरे यांच्या देखरेखीखाली राज्य कर सहायक आयुक्त सचिन सांगळे, दत्तात्रय तेलंग, सतीश लंके, सतीश पाटील आणि राज्य कर निरीक्षकांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेGSTजीएसटीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश