शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Video: बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार; सुप्रिया सुळेंसाठी वाट पाहत थांबले शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 18:00 IST

पत्रकार परिषदेनंतर शरद पवार चक्क वाट पाहत थांबले असल्याने यातून बाप लेकीचे प्रेमळ नातं समोर आलं आहे

पुणे : बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार असं प्रेमळ उदाहरण ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या  नात्यातून दिसून आलं आहे. पुण्यात सुप्रिया सुळेंची शरद पवार चक्क वाट पाहत थांबले आहेत. यातून बाप लेकीचे प्रेमळ नातं समोर आलं आहे. शरद पवार हे सुप्रिया सुळेंची वाट पाहतानाच व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होतोय. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. पवार व सुळे सोमवारी दुपारपर्यंत इंदापूरमध्ये होते. तिथून ते दुपारी आले व दोघांनाही लगेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत मुलाखती सुरू केल्या. मार्केट यार्डमधील पक्ष कार्यालयात या मुलाखती सुरू आहेत. दुपारनंतर सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या. रात्री साडेसात वाजता खासदार सुळे खाली आल्या, त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना बोलण्याची विनंती केली. ती मान्य करत सुळे यांनी कार्यालयाच्या तळमजल्यावरील हॉलमध्ये लगेचच संवाद सुरू केला. दिवसभरातील घडामोडींची माहिती त्या देत होत्या.

दरम्यान शरद पवारही त्यांचे काम संपल्यावर कार्यालयातून खाली उतरले. त्यावेळी त्यांची गाडी हॉलच्या प्रवेशद्वाराजवळच होती. खासदार सुळे पत्रकारांबरोबर बोलत असल्याचे त्यांना दिसत होते. मात्र अतिशय शांतपणे त्यांनी गाडीजवळ उभे राहणे पसंत केले. एकदाही त्यांनी खासदार सुळे यांना कोणाबरोबर निरोप वगैरे काहीच पाठवला नाही. सुळे यांचे बोलणे संपल्यावर त्या आल्या. त्यावेळी पवार गाडीजवळ उभे असल्याचे पाहून त्याही चकित झाल्या. झाले ना, चला आता एवढेच पवार यांना म्हणाले व त्यानंतर दोघेही गाडीत बसून निघून गेले. मोदीबाग येथील निवासस्थानी ते गेले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले

लोकसभेच्या विजयानंतर सुप्रिया सुळेंनी शरद पवार सोबत होते. म्हणून मी निवडणूक जिंकल्याचे सांगितले आहे. बाप पाठीशी असताना मुलीला कसलीही भीती चिंता नसते. शरद पवारांनी सुद्धा मी निवडून येण्यासाठी खूप प्रयत्न केले असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अजूनही अनेक ठिकाणी सभा, बैठका अथवा कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यावर सुप्रिया सुळे पवारांची काळजी घेताना दिसून येतात. त्यांच्या बाप लेकीच्या नात्याचे अनेक किस्सेही पाहायला मिळतात. असाच हा बाप मुलीची वाट पाहतानाच व्हिडिओ चर्चेत आला आहे.         

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणFamilyपरिवारSocialसामाजिकBaramatiबारामती