शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Pune Porsche Car Accident: अख्ख्या अग्रवाल कुटुंबाचे भवितव्य टांगणीला; कुणाची रवानगी कुठं? बुधवारचा दिवस निर्णायक

By नम्रता फडणीस | Updated: June 3, 2024 19:30 IST

बाप विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्यासह पब मालक, चालक, कर्मचारी आणि डॉक्टर यांची रवानगी कुठं होणार हे बुधवारी कळणार

Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणात विविध गुन्हयात अटक झालेल्या आरोपींचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या सर्व आरोपींसाठी बुधवार ( दि. 5) चा दिवस निर्णायक ठरणार आहे. भरधाव वेगाने गाडी चालवित दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा अल्पवयीन मुलगा, मुलाला महागडी पोर्शे गाडी देण्यासह दोन गुन्हयात आरोपी झालेला बाप विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्यासह पब मालक, चालक, कर्मचारी आणि डॉक्टर यांची रवानगी कुठं होणार आहे हे बुधवारी कळणार आहे.

मुलाचा बाप विशाल अग्रवाल याने मुलाला दारुचे व्यसन असल्याचे न्यायालयात मान्य केले होते. त्यानुसार बाल न्याय मंडळाने अल्पवयीन मुलाचे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचा आदेश दिला आहे. मुलाला मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले जावे असे त्याच्या सुरुवातीच्या जामीन अर्जावेळीच न्यायालयाने आदेशात नमूद केले होते. या मुलाची बुधवार (दि. 5) पर्यंत सुधारगृहात रवानगी केली आहे. त्याला सुधारगृहात ठेवण्याची मुदत संपत आल्याने त्याचा तेथील मुक्काम वाढविणार की व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण केंद्रात ठेवणार की त्याची सुटका होणार यावर बुधवारी निर्णय घेतला जाणार आहे.

मुलाला वाचविण्यासाठी आई वडिलांनी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात आई-वडील दोघेही अडकले. दोघांनाही विशेष न्यायालयाने दिलेल्या पोलिस कोठडीची मुदतही बुधवारी संपत आहे. त्यामुळे त्यांना दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तेथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार की पोलिसांना दोघांची पोलिस कोठडी वाढवून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी केलेल्या अर्जावरही बुधवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत दि. 5 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत अधिक वाढ होईल की थेट येरवडा कारागृहात् त्यांची रवानगी होईल हे बुधवारीच कळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयyerwada jailयेरवडा जेल