...अन् शरद पवारांनी थेट झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाच लावला फोन; प्रतिनिधींनाही केले चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 11:11 AM2023-01-08T11:11:52+5:302023-01-08T11:12:03+5:30

झारखंडमधील जैन समाजाच्या तीर्थस्थळाला पर्यटनाचा दर्जा देण्यासंदर्भात सध्या वाद सुरू आहे.

The CM of Jharkhand Hemant Soren, was called and listened to the words of the Jain brothers. | ...अन् शरद पवारांनी थेट झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाच लावला फोन; प्रतिनिधींनाही केले चकित

...अन् शरद पवारांनी थेट झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाच लावला फोन; प्रतिनिधींनाही केले चकित

googlenewsNext

पुणे: वयाच्या ८१ व्या वर्षीही अखंड ऊर्जेने काम करत असलेले खासदार शरद पवार यांनी पुण्यातील सकल जैन समाजाच्या प्रतिनिधींनाही चकित केले. त्यांची मागणी ऐकून घेऊन त्यांनी थेट झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाच फोन लावला आणि प्रतिनिधींचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. सोरेन यांनी जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन या मागण्यांविषयी पुनर्विचार सुरू असल्याचे पवार यांना सांगितले.

झारखंडमधील जैन समाजाच्या तीर्थस्थळाला पर्यटनाचा दर्जा देण्यासंदर्भात सध्या वाद सुरू आहे. सकल जैन समाजाने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला असून, त्याविरोधात देशभर आंदोलन होत आहे. पुण्यातील सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने पवार यांची त्यांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी गुरुवारी दुपारी भेट घेतली. 

या शिष्टमंडळात लक्ष्मीकांत खाबिया, अचल जैन, अभय छाजेड, मिलिंद फडे, हरीशभाई शाह, नितीन जैन, नीलेश शाह, भरत सुराणा, अरुण कटारिया, देवेंद्र बाकलीवाल, अक्षय जैन, पोपटशेठ ओस्तवाल, बाळासाहेब धोका, सुरेंद्र गांधी, ॲड. योगेश पांडे यांचा समावेश होता.

पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्यासमोरच झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना फोन केला. त्यांच्यासमवेत चर्चा केली. महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही पवार यांनी फोन करून मागण्यांविषयी सांगितले. जैन समाजाच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असे साेरेन यांनी स्पष्ट केले. 

Web Title: The CM of Jharkhand Hemant Soren, was called and listened to the words of the Jain brothers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.