किरण शिंदे, पुणेRajendra Hagawane News: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेले दोन आरोपी राजेंद्र हगवणे (सासरा) आणि सुशील हगवणे (दीर) या दोघांना अटक करण्यात आली. मागील काही दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. पुण्यातच २३ मे रोजी पहाटे ४.३० वाजता त्यांना अटक करण्यात आली. दोघांनीही पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ज्या गाड्या वापरल्या त्यापैकी एक गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघेही फरार झाले होते. मागील सात दिवसांपासून दोघेही फरार होते.
११ ठिकाणी फिरले अन् पुण्यात आले
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना आज (२३ मे) पहाटे ४.३० वाजता अटक करण्यात आली. त्यापूर्वी ते तब्बल ११ ठिकाणी गेले आणि तिथे राहिले होते. याबद्दलचा सगळा घटनाक्रम आता समोर आला आहे.
वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर घरातून झाले फरार
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ मे रोजी ते घरातून पळाले. एन्डेव्हर गाडीने औंध रुग्णालयात गेले. मुर्दुल लॉन्सला गेले. तिथे थार गाडी घेतली आणि वडगाव मावळ इथे गेले होते. त्यानंतर ते पवना डॅममधील एका फार्म हाऊसवर थांबले. नंतर आळंदीत आले आणि एका लॉजवर थांबले.
१८ मे रोजी राजेंद्र हगवणे कुठे होता?
१८ मे रोजी ते वडगाव मावळमध्ये आले. तिथून पवना डॅम येथे बंडू फाटक यांच्याकडे थांबले. तिथे जाण्यासाठी मात्र त्यांनी बेलेनो गाडी वापरली. १९ मे रोजी ते सातारा येथील पुसेगावला अमोल जाधव यांच्या शेतावर थांबले. नंतर १९ आणि २० मे रोजी कोगनोळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये होते.
वाचा >>वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
२१ आणि २२ मे रोजी कोगनोळी येथील प्रीतम पाटील या त्याच्या मित्राच्या शेतात थांबले आणि त्यानंतर ते पुण्यात आले होते. त्याच वेळी पोलिसांना त्यांनी अटक केली. पोलिसांना चकवण्यासाठी त्यांनी तीन गाड्या वापरल्या. त्यातील एक थार गाडी जप्त करण्यात आली आहे.