जमीन विक्रीत बिल्डरलाच २५ लाख रुपयांना फसवले; रिअल इस्टेट व्यावसायिकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 13:28 IST2024-06-26T13:28:14+5:302024-06-26T13:28:36+5:30
पिंपरी : जमीन विक्री व्यवहाराबाबत समजुतीचा करारनामा केला. मात्र, व्यवहार पूर्ण न करता बांधकाम व्यावसायिकाची २५ लाख रुपयांची फसवणूक ...

जमीन विक्रीत बिल्डरलाच २५ लाख रुपयांना फसवले; रिअल इस्टेट व्यावसायिकावर गुन्हा दाखल
पिंपरी : जमीन विक्री व्यवहाराबाबत समजुतीचा करारनामा केला. मात्र, व्यवहार पूर्ण न करता बांधकाम व्यावसायिकाची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. रावेत येथे २१ ऑक्टोबर २०२३ ते २४ जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
नामदेव शंकर पोटे (वय ७५, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २४) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाळासाहेब दत्तात्रय गवारे (५०, रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोटे बांधकाम व्यावसायिक आहेत. बाळासाहेब गवारे याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. गवारे याने रावेत येथील ४० गुंठे मिळकत पोटे यांना खरेदी करून देण्याबाबत समजुतीचा करारनामा केला. त्यासाठी गवारे यांनी पोटे यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता त्यांना जमीन खरेदी करू न देता त्यांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र कदम तपास करीत आहेत.