शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका आपल्यालाच बसलाय : आढळराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 14:39 IST

तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय, आढळराव पाटील यांचं वक्तव्य.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दिलीप लांडे हे ३८ वे आमदार त्यांच्या गटात गेल्यानंतर मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला रवाना झाले होते. अनेक बंडखोर आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी मागणी केली होती. दरम्यान, आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका आपल्यालाच बसला असल्याचं वक्तव्य केलं आहे.

“या तालुक्यात सर्वात जास्त, तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय. साधी गोष्ट सांगतो, गेल्या तीन दिवसांपासून ऐकतोय, १५०-२०० जीआर एक दोन दिवसांत काढलेत. पुणे जिल्ह्याच्या डीपीडीसीचा १७० कोटी रूपयांचा फंड एकतर्फी शिरूरच्या खासदारांना १५ कोटी, बारामतीच्या खासदाराला १८ कोटी, जुन्नरच्या आमदारांना १० कोटी, खेडच्या आमदारांना १२ कोटी अशा १७८ कोटींचे प्रस्ताव मंजूर करून सहीला गेलेत. जिल्हा परिषदेचे सदस्य नाही, मंत्री नाहीत, कोणाला काही विचारलं नाही, कोणाचं काही अपील नाही. हे काय सुरू आहे? किती आम्ही सहन करायचं याचा विचार व्हायला पाहिजे या मताचा मी आहे,” असं आढळराव पाटील म्हणाले. पुण्यातील चाकण येथे बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं.

“कोणत्याही परिस्थिती शिवसेना एकत्र राहिली पाहिजे. आजही आपल्या पक्षावर संकट आलंय. सर्वांचीच जबाबदारी आहे, पण मी पुढे राहणार. पण बोटचेपी धोरण करता कामा नये. कशासाठी लोक तुमच्याकढे येतील, का उभे राहतील?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावPuneपुणे