शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 14:59 IST

विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या तिन्ही ठीकाणी मी गेली ५६ वर्ष काम करतोय, वय काढणाऱ्या अजित पवारांचा ८४ वयाचा मुद्दा खोडुन काढला.

बारामती : गेल्या १० ,२० वर्षात बारामतीत स्थानिक राजकारणात लक्ष दिले नाही. चांगले काम करा, अडचण आल्यास सांगा, अशी भुमिका घेतली. मात्र, काहींनी टाेकाची भुमिका घेतली. भाजप हा सर्वसामान्यांच्या हिताची जपणुक करणारा पक्ष नाही. बारामतीकरांनी त्यांच्याबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत. असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

सोमवारी (दि ८) शरद पवार यांनी जिरायती भागाचा दाैरा केला. यावेळी उंडवडी क.प. येथे आयोजित सभेत पवार यांनी मोदींसह अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, विधानसभेला बारामतीकरांनी राष्ट्रवादीला मते दिली. त्यांनी निवडलेला रस्ता चुकीचा असल्याचे पवार यांनी सांगत अजित पवार यांना चिमटे काढले.

पवार पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदापासुन पंतप्रधान पदापर्यंत पोहचले. त्यांच्या गुजरातला केंद्रात कृषिमंत्री असताना प्रचंड मदत केली. त्यावेळी ते कोणत्या पक्षात आहेत ते पाहिले नाही. त्या राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत करण्याचे धोरण नेहमी राबविले. शेतकऱ्यांसाठी ती मदत केली. एके दिवशी ते बारामतीत आले. त्यांनी माझ बोट धरुन शरद पवारांनी शिकविल्याचे सांगितले. आज तेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेगळी भुमिका घेतात. त्यांच्यावर टीेकाटीप्पणी करणाऱ्या झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतात. हि लोकशाही नाही,तर  हुकुमशाही आहे. ती न आवरल्यास देशात चित्र बदलेल. मुठभर लोकांच्या हाती सत्ता जाईल. आज सर्व सत्ता मोदींच्या हातात केंद्रीत आहे, त्यातून आपल्याला सुटका करावयाची असल्याचे पवार म्हणाले. यावेळी काही लोक गेले. त्यांनी पक्ष सोडला. आता आणखी इतिहास सांगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला, त्यांना निवडुक कोणी आणले, त्यांना मंत्रीपदे कोणी दिली, असा सवाल शरद पवार यांनी केेला.

...ज्यांना अधिकार दिले, त्यांनी काम केलं नाही.

‘जनाई शिरसाई’ बाबत मला माहिती नव्हते. मी आता त्यामध्ये लक्ष घालणार आहे. काम कसं होत नाही बघतो. ज्यांच्यावर जबाबदारी दिली,अधिकार दिले त्यांनी काम केलं नाही. आता मी काम पूर्ण करणार आहे. कारण ही सर्व माझी माणसं आहेत, असा अप्रत्यक्ष टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला.

...माझं वय काढू नका,तुम्ही काय बघितले आहे माझं ?

विरोधक म्हणतात माझं वय ८४ वय झालं. आता ८४ वर्षाचा योध्दा काय करणार, त्यांना माझं सांगण आहे, माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितले आहे माझं ? मी थांबणार नाही. तुम्ही मला काय केलं नाही. चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रात कृषी मंत्री केलं. विधानसभा, राज्यसभा , लोकसभा या तिन्ही ठीकाणी मी गेली ५६ वर्ष काम करत आहे. मला तुम्ही लोकांनी एकही दिवस सुट्टी दिली नाही. तुमच्यासाठी शेवटपर्यंत काम करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे,अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांना सुनावले. अजित पवार यांनी मांडलेला पवार यांच्या ८४ वयाचा मुद्दा खोडुन काढला. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभा