मामा तुमच्या व पाटलांच्या पक्षांची राज्यात युती; मात्र आम्ही कुठे आम्हालाच माहिती नाही - महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 04:14 PM2023-12-10T16:14:37+5:302023-12-10T16:15:17+5:30

दोन्ही मोठ्या नेत्यांच्या मदतीने बाबीर देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही

The alliance of dattatray bharne you and harshvardhan Patil parties in the state But we do not know where we are Mahadev Jankar | मामा तुमच्या व पाटलांच्या पक्षांची राज्यात युती; मात्र आम्ही कुठे आम्हालाच माहिती नाही - महादेव जानकर

मामा तुमच्या व पाटलांच्या पक्षांची राज्यात युती; मात्र आम्ही कुठे आम्हालाच माहिती नाही - महादेव जानकर

कळस : भरणेमामा तुमच्या व हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांची राज्यात युती आहे. मात्र आम्ही कुठे आहोत आम्हालाच माहिती नाही. तुम्ही दोघे आज मांडीला मांडी लावून बसला आहात. मी शेजारी बसलोय तरीपण दोघांनाही हाताला धरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे घेऊन जाईल व बाबीर देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही अशी राजकीय टोलेबाजी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लगावली.

इंदापूर तालुक्यातील राजकीय आखाड्यात विळ्या-भोपळ्याचे वैर असलेले आमदार दत्तात्रेय भरणे, व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी सभापती प्रवीण माने हे बाबीर मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान एकाच व्यासपीठावर आले होते. मंदिराच्या कामासाठी देणगी जाहीर करण्यावरून या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. 
 
यावेळी रासपचे अध्यक्ष जानकर म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांचे थेट दिल्लीत चांगले संबंध आहेत. आता ते मोदी, शहांच्या जवळ जाऊन बसतात. तर भरणे यांचा फोन गेला की अजितदादा लगेच फाईलवर सही करतात. अशा या दोन्ही मोठ्या नेत्यांकडून मंदिर कामासाठी जास्तीच्या निधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले,आमची राज्यात युती असली तरी मी स्वतः सतेत नाही भरणे सतेत आहेत कोणाचही सरकार आले तरी ते सत्तेत असतात त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त आहे  बाबीर देवाचा इतिहास भाविकांना कळला पाहिजे. बाबीर देव हे महादेवाचे रूप आहे व येथे सभेत महादेव उपस्थित आहेत. म्हणून आता निधीची कमतरता जाणवणार नाही. परंतू मंदिराच्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे. वैयक्तिक पंधरा लाखांचा निधी देणार आहे

आमदार भरणे म्हणाले, सध्याची सभा राजकीय नसून देणगीदारांची देणगी जमा करण्यासाठी आहे. मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल या परिसराचा विकास करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले असुन मंदिरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. माजी सभापती प्रवीण माने यांनी येथील रस्ता, सभामंडप कुस्ती आखाडा सभापती असताना मी पूर्ण केला असुन मंदिरासाठी भरघोस निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.  

Web Title: The alliance of dattatray bharne you and harshvardhan Patil parties in the state But we do not know where we are Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.