शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शिरूर येथे एन के साम्राज्यच्या नावाने दहशत माजवणारा टोळीचा म्होरक्या दिल्लीतून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 1:18 PM

टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

ठळक मुद्देएन के साम्राज्य टोळीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे

शिरूर: नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा भर दिवसा शिरूर बाजार पेठेत एन के टोळीकडून खून करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात या टोळीची दहशत वाढत चालली होती. या टोळीचा म्होरक्या नानु उर्फ निलेश चंद्रकांत कुर्लप व त्यांचे सदस्य यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न व इतर गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील १३ जणांना मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले होते. मात्र नानु उर्फ निलेश कुर्लप हा फरारी होता.  त्याला दिल्ली येथून अटक करण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

जानेवारीमध्ये प्रविण गोकुळ गव्हाणे यास एन. के. साम्राज्य टोळीतील सदस्यांनी कट रचला. शिरूर शहरातचं भररस्त्यात सायंकाळच्या वेळी गोळीबार करून व कोयत्याने वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये एन.के.साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा गुन्हा केल्यापासून फरारी होता.  या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले होते. सदर गुन्हयाचा तपास करत असताना निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा दिल्ली येथे लपून बसला आहे.  अशी गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एन.के.साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु कुर्लप यास दिल्ली येथून ताब्यात घेतले.  पुढील कार्यवाहीकरीता शिरूर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक