शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Video: नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चुराडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 11:13 IST

सकाळी नऊ दरम्यान कामांवर जाणाऱ्यांची लगबग सुरू असते. यावेळी नवले पुल परिसरातील महामार्गावर रोज गर्दी असते. मात्र आज महामार्गावर अपघात घडला त्यावेळी आजूबाजूला कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला (pune navle bridge accident)

धायरी: मुंबई-  बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. यामध्ये चालक जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनर नवले पुल परिसरात आल्यानंतर कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. अपघात एवढा भीषण होता की, चालकाच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी चालकाला बाहेर काढले. क्रेन च्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन काढण्याचे काम सुरू असून महामार्गावर वाहनांच्या रांगा लांबवर लागलेल्या आहेत. 

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही....

सकाळी नऊ दरम्यान कामांवर जाणाऱ्यांची लगबग सुरू असते. यावेळी नवले पुल परिसरातील महामार्गावर रोज गर्दी असते. मात्र आज महामार्गावर अपघात घडला त्यावेळी आजूबाजूला कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त कंटेनर ची अवस्था पाहिल्यानंतर अपघाताची भीषणता लक्षात येते आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDhayariधायरीvadgaon-sheri-acवडगाव शेरी