शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Accident: पुणे - मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, १ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:01 IST

कामशेत गावच्या हद्दीतील जुना मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत सोमवारी पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास कारच्या भीषण अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू

वडगाव मावळ : कामशेत गावच्या हद्दीतील जुना मुंबई महामार्गावरील कामशेत खिंडीत सोमवारी पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास कारच्या भीषण अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन (वय ४४, रा. कळवा, ठाणे) व औतार गुरुदयाल सिंग सेहेरा (वय ५०,रा. कोपरी, ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर नितेशकुमार देवेंद्रकुमार जैन हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास मुंबई कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या लाकूड वाहतूक करणार कंटेनर हा कामशेत खिंड उतरत असताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने पुणे लेनवर पलटी झाला. व कंटेनर मधील सर्व लाकडे मुंबई लेनवर पडली होती. त्यावेळी पुणे कडून मुंबईकडे निधालेली मारुती कार ही महामार्गावर पडलेल्या लाकडांना वेगात येऊन आदळल्याने कार मधील पुढे बसलेले राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन व औतार गुरुदयाल सिंग सेहेरा यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर मागच्या सीटवर बसलेले नितेशकुमार देवेंद्र कुमार जैन हे या अपघात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामशेत येथील महावीर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

 या अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार समीर शेख व पोलीस नाईक अनिल हिप्परकर, सुनिल गवारी, सचिन निंबाळकर, केकेआर रुग्णवाहिकेचे चालक कैसर शेख, स्वप्नील मोकाशी यांनी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना तात्काळ बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. या आपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने व लाकडे बाजूला करून वाहरुक सुरळीत करण्यात आली आहे.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळPuneपुणेAccidentअपघातMumbaiमुंबईSocialसामाजिक