शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गंगाधाम चौकात भीषण अपघात; पोलिस आयुक्तांनी केली घटनास्थळाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:15 IST

- जड वाहनांना बंदी असतानाही या रस्त्यावर सर्रासपणे वाहतूक सुरू, भुसार बाजारात असणारी अतिक्रमणे दूर करण्यासाठी नागरिकांची मागणी

पुणे : मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात बुधवारी (दि. ११) सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सासरे हे गंभीर जखमी झाले.या अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. गंगाधाम चौकात यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये याच ठिकाणी डंपरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पुनरावृत्ती होण्याची भीती, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोपगंगाधाम चौक ते आई माता मंदिर या मार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. दिवसा जड वाहनांना बंदी असतानाही या रस्त्यावर सर्रासपणे त्यांची वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर आणि वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीतील ढिलाईवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या मार्गावर मनपा आयुक्त व पोलिस आयुक्तांनी योग्य मार्ग काढून त्वरित उपाययोजना करून अवजड वाहनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.मार्केट कमिटीत असणारी अतिक्रमणेभुसार बाजारात असणारी अतिक्रमणे जिथे पार्किंगसाठी आणि मालाची वाहतूक करण्यासाठी जागा राखीव आहे त्या ठिकाणी संबंधित अडत्यांनी, व्यापाऱ्यांनी गोडाऊन केल्यामुळे ट्रॅफिक रस्त्यावर येते आणि त्याचाच परिणाम म्हणून वाहतूक कोंडी होते आणि असे अपघात वारंवार होतात. त्यामुळे मूळ प्रश्न व्यापाऱ्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा आहे. ही बांधकामे बाजार समिती प्रशासन, पुणे महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस विभाग यांनी संयुक्तपणे त्वरित काढण्याची व्यवस्था करावी.

आई माता मंदिर ते पुना मर्चंट चेंबर ब्रिज बांधणे आवश्यकगंगाधाम चौकात नुकताच अपघात झाला. यापूर्वीही तेथे अनेकदा अपघात झाले. खालच्या बाजूस मार्केटयार्ड आहे, तेथे येण्याकरिता एकच रस्ता आहे. मार्केटयार्ड वरून शहराला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असतो. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस ३२ मजल्याच्या भव्य मोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत. यामुळे अवजड वाहने या भागातून जातात. त्यामुळे आई माता मंदिर ते पुना मर्चंट चेंबरपर्यंत पूल बांधणे गरजेचे आहे. ही व्यापाऱ्यांची अनेक दिवसांची ही मागणी आहे. याकडे प्रशासनाचे व स्थानिक नगरेसवकांचे दुर्लक्ष आहे.  - वालचंद संचेती माजी अध्यक्ष, पुना मर्चंट चेंबर, मार्केटयार्ड या अपघातामुळे गंगाधाम चौकातील वाहतूक सुरक्षा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांचा संताप लक्षात घेता, प्रशासनाला यावर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त व पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे. - संतोष नागरे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट कमिटीत असणारी अतिक्रमणे हटवाभुसार बाजारात असणारे अतिक्रमणे भुसार बाजारात जिथे पार्किंगसाठी आणि मालाची वाहतूक करण्यासाठी जागा राखीव आहे. त्या ठिकाणी संबंधित अडत्यांनी व्यापाऱ्यांनी गोडाऊन केल्यामुळे वाहतूक रस्त्यावर येते आणि त्याचाच परिणाम म्हणून याठिकाणी अपघात वारंवार होतात त्यामुळे मूळ प्रश्न व्यापाऱ्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा आहे ही बांधकामे बाजार समिती प्रशासन, पुणे महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग पोलिस यांनी संयुक्तपणे त्वरित काढण्याची व्यवस्था करावी. - सादिक लुकडे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड