‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 03:31 PM2019-09-26T15:31:53+5:302019-09-26T15:35:28+5:30

भविष्यकाळाची गरज ओळखून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने स्वत:च्या खजिन्यातील संग्रही १८ हजार चित्रपटांचे देखील डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे...

Tenders for 'digital stores' will be soon | ‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार

‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार

googlenewsNext
ठळक मुद्दे डिजिटल चित्रपटांच्या साठवणुकीसाठी एनएफएआय उभारणार यंत्रणा

- नम्रता फडणीस -

पुणे : गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत ‘डिजिटल’ चित्रपट निर्मितीचा ‘ट्रेंड’ आला आहे. मात्र डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट वर्षानुवर्षे जतन करण्यासाठीची यंत्रणा तूर्तास तरी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे डिजिटल चित्रपटांच्या साठवणुकीसाठी संग्रहालयाने पावले उचलली असून, ‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. 
गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. चित्रपटसृष्टीनेही ही तंत्रज्ञानाची स्थित्यंतरे अनुभवली आहेत. चित्रपटकर्त्यांना सेल्युलाईड, १६ एमएम, ३५ एमएम असा प्रवास घडला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही  ‘डिजिटल’ युग अवतरले आहे. २00८ पासून डिजिटल माध्यमात चित्रपटनिर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यकाळाची गरज ओळखून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने स्वत:च्या खजिन्यातील संग्रही १८ हजार चित्रपटांचे देखील डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र  काही नवीन डिजिटल माध्यमातील चित्रपट देखील संग्रहालयाकडे जतनासाठी येत आहेत. जुन्या स्वरूपातील चित्रपटांच्या तुलनेत नव्याने उपलब्ध झालेल्या डिजिटल चित्रपटांचा साईज अधिक असल्यामुळे या चित्रपटांची साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात माहिती देताना संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, संग्रहालयाचे काम हे चित्रपटांची रिळं जतन करण्याचे आहे. 
सध्याचे सर्व चित्रपट डिजिटल माध्यमात बनत आहे. डिजिटल चित्रपट जतन करण्यासाठीची यंत्रणा संग्रहालयाकडे नाही. त्यामुळे ‘डिजिटल स्टोअर’ उभारण्यासाठी आयआयटी मुंबई, कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, सीडॅक, एनआयसी या संस्थांमधील तज्ज्ञांशी चर्चा झाली आहे. एनएफएआयच्या कोथरूड फेज २ मध्ये ही डिजिटल यंत्रणा उभारली जाईल. यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील.
डिजिटल चित्रपटांच्या जतन प्रक्रियेसाठी वारंवार खर्च करावा लागतो. उदा: एखाद्याची मोठी निर्मिती संस्था आहे. जे वीस ते पंचवीस चित्रपट तयार करतात. त्यांनी जर त्यांचे चित्रपट जतन करण्यासाठी  संग्रहालयाकडे  दिले नाहीत, तर त्यासाठी निर्मात्यांना विशेष यंत्रणा राबवावी लागेल. त्याच्या देखरेखीसाठी मनुष्यबळ वाढवावे लागेल. 
तो जतन करण्याचा खर्च हा सेल्युलाईडपेक्षा अधिक आहे. त्यापेक्षा हे चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी देणेच अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे ते म्हणाले. पुणे : गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत ‘डिजिटल’ चित्रपट निर्मितीचा ‘‘ ट्रेंड ’’ आला आहे. मात्र डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट वर्षानुवर्षे जतन करण्यासाठीची यंत्रणा तूर्तास तरी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे डिजिटल चित्रपटांच्या साठवणुकीसाठी संग्रहालयाने पावले उचलली असून, ‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. 
गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. चित्रपटसृष्टीनेही ही तंत्रज्ञानाची स्थित्यंतरे अनुभवली आहेत. चित्रपटकर्त्यांना सेल्युलाईड, १६ एमएम, ३५ एमएम असा प्रवास घडला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही  ‘डिजिटल’ युग अवतरले आहे. २00८ पासून डिजिटल माध्यमात चित्रपटनिर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यकाळाची गरज ओळखून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने स्वत:च्या खजिन्यातील संग्रही १८ हजार चित्रपटांचे देखील डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र  काही नवीन डिजिटल माध्यमातील चित्रपट देखील संग्रहालयाकडे जतनासाठी येत आहेत. जुन्या स्वरूपातील चित्रपटांच्या तुलनेत नव्याने उपलब्ध झालेल्या डिजिटल चित्रपटांचा साईज अधिक असल्यामुळे या चित्रपटांची साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात माहिती देताना संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, संग्रहालयाचे काम हे चित्रपटांची रिळं जतन करण्याचे आहे. 
सध्याचे सर्व चित्रपट डिजिटल माध्यमात बनत आहे. डिजिटल चित्रपट जतन करण्यासाठीची यंत्रणा संग्रहालयाकडे नाही. त्यामुळे ‘डिजिटल स्टोअर’ उभारण्यासाठी आयआयटी मुंबई, कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, सीडॅक, एनआयसी या संस्थांमधील तज्ज्ञांशी चर्चा झाली आहे. एनएफएआयच्या कोथरूड फेज २ मध्ये ही डिजिटल यंत्रणा उभारली जाईल. यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील.
..............
टेंडर अजून निघाले नाही..
’सध्या जगभरामध्ये चित्रपटांसाठी एल्टिओ 7 टेप (लिनिअर टेप ओपन) जनरेशनचा वापर केला जातोय. भारतातही हेच तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाली आहे. एखादा चित्रपट हाय रिझोल्युशनमध्ये म्हणजे 2 के ( २ टू ३ टेराबाईट) आणि 4 के ( ८ टू १२ टेराबाईट) प्रकारात असतो. या ‘डिजिटल स्टोअर’मध्ये त्याची वेगळी व्हजनर््स आपण जतन करू शकू. डिजिटल लायब्ररी किंवा इंटरनेटच्या माध्यमातून वितरित करायचे असेल तर वेगवेगळी लो रिझोल्युशनची व्हर्जन्स लागतील. त्यात पासवर्ड दिलेले असतील.

............................

डिजिटल स्टोअरसाठीचे टेंडर अजून निघालेले नाही. ते लवकरच निघेल. मुळातच  या डिजिटल चित्रपटासाठी कुठल्याही राज्यात पॉलिसी तयार झालेली नाही.  डिजिटल हे असे तंत्रज्ञान आहे ज्यात बॅकअप ठेवणे आवश्यक आहे. एकाच ठिकाणी दोन्ही कॉपी ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे निर्मात्यांना एक कॉपी स्वत:जवळ आणि दुसरी वेगळ्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल चित्रपट जतन करण्याची गरज नसते. केवळ वर्षानुवर्षे टिकण्यासाठी यंत्रणा राबवावी लागणार आहे.

- डॉ. उज्ज्वल निरगुडकर, तांत्रिक सल्लागार राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

Web Title: Tenders for 'digital stores' will be soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.