शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मावसबहिणीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या भावाला दहा वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:09 IST

पुणे : अल्पवयीन मावस बहिणीलाच पळवून नेत तिला लग्नाचे आमिष दाखवित अत्याचार करणाऱ्या भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि ...

पुणे : अल्पवयीन मावस बहिणीलाच पळवून नेत तिला लग्नाचे आमिष दाखवित अत्याचार करणाऱ्या भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

ही घटना १ मार्च २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नवी सांगवी परिसरात घडली. याबाबत ४० वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी हा हदगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी आहे. गेल्या सहा वर्षांपासून कामानिमित्त तो त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. घटनेच्या दिवशी त्याने १५ वर्षीय अल्पवयीन पीडितेला फूस लावून पळवून नेत भाड्याच्या खोलीत ठेवले. तुझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे खोटे सांगून तिच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी त्याला अटक करत दोषारोपत्र दाखल केले.

याप्रकरणात सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. आरोपीचे घटनेच्या पूर्वीपासून पीडितेशी प्रेमसंबंध होते. त्यास तिची संमती होती. यास आरोपीच्या वतीने केलेल्या युक्तिवादाला अ‍ॅड. घोगरे पाटील यांनी विरोध केला. आरोपीच्या म्हणण्यानुसार पीडितेची संमती असली तरी ती अल्पवयीन आहे. त्यामुळे कायद्याने तिची संमती ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे आरोपीस बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. ती ग्राह्य धरत न्यायालयाने बाललैगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ४ व ६, भा. दं. वि. कलम ३७६ नुसार आरोपीस शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस संजय बनसोडे व राजेंद्र सोनवणे यांनी मदत केली.