शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अवैध वाळूचे दहा ट्रक पकडले : शेतकऱ्यांची दैना, वाळूमाफियांची चैन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 20:08 IST

मांडवगण फराटा परिसरातील भीमा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी शिल्लक न राहिल्यामुळे नदीपात्रातील वाळूवरती वाळूचोरांचा डोळा होता.

ठळक मुद्देमांडवगण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने या वाळू ट्रकचालकांना अडविले दहा ट्रकपैकी एकाचाही चालक सापडला नाही अवैध रीतीने होणाऱ्या वाळू चोरावरती कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार

शिरुर : दुष्काळामुळे सध्या शेतीतील काळी माती भेगाळली असून, शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तर दुसरीकडे नद्या कोरड्या पडल्याने थेट नदीपात्रात ट्रक नेऊन वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे वाळू माफियांची चैन सुुरू झाली आहे. सध्या शिरूर तालुक्यातील कोरड्या भीमा नदीत हा प्रकार राजरोस पाहायला मिळत होता. त्यावर अखेर आज पोलिसांनी कारवाई केली असून, वाळूने भरलेले तब्बल दहा ट्रक जप्त केले आहेत. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील आऊट पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक तारू, योगेश गुंड, धर्मराज खराडे, अक्षय काळे यांच्या पथकाने आज सकाळी दहा ट्रकवर ती कारवाई केली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मांडवगण फराटा परिसरातील भीमा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी शिल्लक न राहिल्यामुळे नदीपात्रातील वाळूवरती वाळूचोरांचा डोळा होता. त्यामुळे त्यांनी गणेगाव दुमाला, बाभुळसर या परिसरात नदीपात्र कोरडे ठाण असल्यामुळे भीमा नदीपात्र अक्षरश: पोखरून टाकली. याच पात्रातील वाळू चोरून दहा ट्रक घेऊन मांडवगणच्या दिशेने येत होते. या वेळी मांडवगण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने या वाळू ट्रकचालकांना अडविले. परंतु ट्रकचालक पोलिसांना गुंगारा देत पसार झाले. नदीपात्र कोरडे पडल्यामुळे वाळूचोरांचा या काळ्या सोन्यावर डोळा असल्यामुळे या भागात दौंड, नगर, पुणे या भागातून वाळू ट्रकची दिवसभर वाहतूक सुरु असते. याबाबत तहसीलदार गुरू बिराजदार, मंडळ अधिकारी प्रसन केदारी, गावकामगार तलाठी पी. बी. कोळगे यांनी पंचनामा केला आहे. सर्व वाहने मांडवगण फराटा औट पोलीस चौकीला उभी केली आहेत. विशेष म्हणजे यातील ट्रक वर नंबरप्लेट नाहीत. त्यामुळे ट्रक कुणाच्या मालकीच्या आहेत याबाबत पोलिसांना माहिती मिळाली नाही. दहा ट्रक वाळूच्या ड्रायव्हरपैकी एकही न सापडल्यामुळे या वाळूचोरांचे रॅकेट मोठे असल्याचे ग्रामस्थ बोलले जात आहे.--दहा ट्रकपैकी एकाचाही चालक सापडला नाही राजरोसपणे सध्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधील वाळूउपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याच्या बातम्याही अनेक ठिकाणी प्रसिद्ध होत असून, ग्रामस्थांकडून तक्रारी होत आहेत. त्यामुळे आजअखेर मांडवगण फराटा औट पोलिसांनी कारवाई केली. तुटपुंज्या कर्मचाºयांनी दहा ट्रकवर धाडी टाकल्या. त्या वेळी सर्व दहाच्या दहा ट्रकचालक व कर्मचारी पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय ट्रकला नंबरप्लेट नसल्याने एकाही आरोपीचे नाव निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ही प्रकरणात गौडबंगाल असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. केवळ जप्ती नको तर वाळूमाफियांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली तरच भविष्यात नदी वाचेल, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.-------अवैध रीतीने होणाऱ्या वाळू चोरावरती कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. आज सापडलेल्या ट्रक कोणाच्या मालकीच्या आहेत त्याचा पोलीस तपास घेत असून, त्यांंच्याविरुद्ध प्रशासनाकडून फिर्याद देण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- गुरूबिराजदार, तहसीलदार, शिरूर  

टॅग्स :Shirurशिरुरsandवाळूcollectorजिल्हाधिकारी