शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

बंद दरम्यान हयात हॉटेलमध्ये घुसून मोडतोड करणाऱ्या दहा शिवसैनिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:31 IST

मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ जणांच्या जमावाने हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती.

ठळक मुद्देदोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश शिवसेना गटनेत्याच्या भावाचा आरोपींमध्ये समावेश,

विमाननगर - मराठा आरक्षणासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान कल्याणीनगर येथील हयात हॉटेलमध्ये घुसून मोडतोड मारहाण करणाऱ्या दहा शिवसैनिकांना येरवडा पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली . अटक आरोपींमध्ये शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या भावाचा समावेश असुन आरोपींना १३ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.अटक केलेल्या आरोपींमध्ये शिवसेनेचे पुणे महापालिकेचे नगरसेवक व गटनेते संजय भोसले यांचा भाऊ चंद्रकांत भोसले यांचा देखील समावेश आहे.या प्रकरणी भास्कर रामराव भोसले (वय५१रा. रामनगर येरवडा), आशिष यशवंत शिर्के (वय २१रा.नागपूर चाळ येरवडा),चंद्रकांत शशिकांत भोसले (वय४८, रामनगर येरवडा ),शशिकांत चंद्रकांत बाराते (वय २४रा.लक्ष्मीनगर येरवडा ),सचिन दिनकर भोसले (वय ४७ रा.रामनगर येरवडा),दिलीपसिंह अष्टभुजा ठाकूर (वय २७ रा.रामनगर येरवडा),प्रमोद रविकांत जाधव (वय २८रा.रामनगर येरवडा),प्रशांत कृष्णा मोरे (वय३२ रा. रामनगर येरवडा),किशोर यशवंत काटकर (वय ५०,रा.बी.टी.कवडे रोड घोरपडी), यशवंत उर्फ सुनील भानुदास मोरे (वय५०, रा. रामनगर येरवडा) यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे .मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथील हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ शिवसैनिकांनी ८ ते ९ दुचाकीवरून येऊन  बेकायदेशीरपणे जमावाने हॉटेलच्या आवारात घुसून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील मोबाइल फोडून हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीवरून अंदाजे २० ते २५ शिवसैनिकांविरुद्ध येरवडा पोलिसांनी विविध गंभीर गुन्हे दाखल केले होते.याप्रकरणी अधिक तपासात हयात हॉटेलच्या आवारात मिळालेल्या सीसीटी फुटेजवरून गुन्ह्यातील १० आरोपींना शनिवारी दुपारी रामनगर येरवडा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक  पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे,उपनिरीक्षक रवींद्र गवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळसाहेब बहिरट, पोलीस हवालदार  हनुमंत जाधव, हरिश्चंद्र मोरे, पोलीस नाईक किशोर सांगळे ,अशोक गवळी यांच्या पथकाने शनिवारी दुपारी बारा वाजेणेच्या सुमारास रामनगर येथे अटक केली. अटक आरोपींना १३ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गंभीर गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे करत आहेत .

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदCrimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिसShiv Senaशिवसेना