शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीत नियमभंग करणा-या मंडळाच्या दहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 21:46 IST

गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये डीजे लावून आणि दिलेला मार्ग अचानक बदलून उलट दिशेला मिरवणूक काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.

ठळक मुद्देफर्ग्युसन कॉलेज रोडवरील प्रकार: डीजे लावून वाहतुकीस अडथळा

पुणे : गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये डीजे लावून आणि दिलेला मार्ग अचानक बदलून उलट दिशेला मिरवणूक काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर बुधवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.         नागेश तुकाराम दरगुडे (वय ४२, रा. मंगळवार पेठ), सत्यजित बाळासाहेब कराड ( वय २९, रा.धनकवडी), राजेश सुभाष मेनन (वय २५, रा. पर्वतीगाव), महेश शाहु मोहिते (वय २५ , जनता वसाहत), जितेंद्र गोविंद जोशी (वय ४७, रा. जनवाडी), प्रतिक प्रमोदसिंग जव्हेरी (वय २९, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड), विश्वनाथ आण्णा साबळे (वय २९, रा. जनवाडी, गोखलेनगर), निलेश आनंद कांबळे (वय ३५), तपन विठ्ठल कानडे (वय २४, दोघे रा. बुधवार पेठ) आणि अनिकेत किशोर शहाणे (वय २७,रा. घोरपडे पेठ) यांना अटक केली आहे.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभि इॅम्पॅक्ट लॉजिस्टिक्स सोल्युशन प्रा.लि.बाणेर या कंपनीचे मालक, गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनानी बुधवारी रात्री फर्ग्युसन कॉलेज रोडवर कंपनीत बसविलेल्या गणपती मूतीर्ची ट्रॅक्टरवर विसर्जन मिरवणूक काढली होती. यावेळी एका टेम्पोमध्ये डीजेही लावण्यात आला होता. तसेच ५० वादकांचे ढोलताशा पथक, बाउंसर आणि कामगार असे एकुण दीडशे ते दोनशे जण एकत्र येवून फर्ग्युसन रोडवरील वाहतूक अडवून बंद केली. ऐनवेळी मिरवणूकीसाठी दिलेला मार्ग बदलून आदेशाचा भंग करत फर्ग्युसन रोडवर ज्ञानेश्वर पादुका चौकाकडून उलट दिशेने गणपतीची मिरवणूक काढली असल्याचे पोलिसांतर्फे  देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी रात्री मंडळाच्या दहा पदाधिकाऱ्यांना अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी काटे करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGanpati Festivalगणेशोत्सव