शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

केवळ एका इमारतीलाच तात्पुरती स्थगिती, कोथरुड गृहनिर्माण प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:47 AM

पुण्यातील काकडे कन्स्ट्रक्शन प्रा.लि. च्या कोथरूड प्रकल्पातील ‘इ-१’ या इमारतीच्या बांधकामाबाबत वाद निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने एक मार्च रोजी या इमारतीच्या बांधकामावर तात्पुरती स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना काकडे कन्स्ट्रक्शन प्रा.लि ला नोटीस बजावण्याचे निर्देश देत पुणे जिल्हाधिकारी व पुणे पालिकेला १९ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.

मुंबई - पुण्यातील काकडे कन्स्ट्रक्शन प्रा.लि. च्या कोथरूड प्रकल्पातील ‘इ-१’ या इमारतीच्या बांधकामाबाबत वाद निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने एक मार्च रोजी या इमारतीच्या बांधकामावर तात्पुरती स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना काकडे कन्स्ट्रक्शन प्रा.लि ला नोटीस बजावण्याचे निर्देश देत पुणे जिल्हाधिकारी व पुणे पालिकेला १९ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. दरम्यान, संजय काकडे यांनी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याने न्यायालयाने इमारतीच्या बांधकामावर तात्पुरती स्थगिती दिल्याचे म्हणत काकडे कन्स्ट्रक्शनवरील सर्व आरोपांचे खंडन केले.कोथरूड प्रकल्पातील ‘इ-१’ या ४० हजार चौरस फूट इमारतीच्या बांधकामाविरुद्ध खडकवासला धरण प्रकल्पग्रस्त विशाल मोरे व अन्य एकाने दाखल केलेल्या याचिकेनुसार, खडकवासला धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकारने हवेली तालुक्यातील हिंगणे गावात ३१ एकर २१ गुंठा भूखंड दिला. त्याच्या विकासासाठी काकडे कन्स्ट्रक्शनला पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी दिली. पुणे जिल्हाधिकाºयांनी काकडेंबरोबर करार करत एकूण भूखंडातील ३० टक्के जागेवर प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधण्याची व ७० टक्के भूखंडावर खासगी विकास करण्याची परवानगी दिली. काकडे कन्स्ट्रक्शनने खासगी विकासासाठी ७० टक्के भूखंडावर बांधकाम सुरू केले. येथील सुमारे २०० सदनिका बाजारभावाने विकण्यातही आल्या आहेत.या आरोपांचे संजय काकडे यांनी खंडन केले. ‘कोथरूड प्रकल्पा’ला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसून त्यातील ४० हजार चौरस फुटांच्या ‘इ-१’ इमारतीच्या बांधकामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्यांनी दिशाभूल केल्याने न्यायालयाने ही स्थगिती दिली. पुढील सुनावणीस म्हणजेच ४ एप्रिल रोजी आम्ही आमचू बाजू न्यायालयात मांडू. मला खात्री आहे की, आमची बाजू ऐकल्यावर न्यायालय ही स्थगिती हटवेल,’ असे काकडे यांनी सांगितले. ‘सरकारची व पुनर्वसनधारकांची आम्ही कोणतीही फसवणूक केलेली नाही. सरकारने आम्हाला संबंधित जागेचा ताबा २००२ मध्ये ुदिला. २००७ पर्यंत ९० टक्के बांधकाम पूर्ण होऊन ३१७ लोकांना सदनिकेचा ताबाही दिला. उर्वरित ३५ जणांनी आम्हाला स्वत:हून बांधकाम करण्यास मुदतवाढ दिली. त्यांना आम्ही कराराप्रमाणे दरमहा भाडे देत आहोत. राज्य सरकारने व भूखंडांच्या मूळ मालकांनी याबाबत कधीच तक्रार केली नाही. जे दोन लोक न्यायालयात आले आहेत, त्यांच्याही सदनिका तयार असून त्यांना ताबा देण्यास आम्ही तयार आहोत,’ असे काकडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणे