Pune | पुणे शहरात कोरेगाव पार्कातील तापमानाचा पारा गेला उच्चांकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:59 IST2023-04-20T12:58:14+5:302023-04-20T12:59:21+5:30
चार दिवसांत तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे...

Pune | पुणे शहरात कोरेगाव पार्कातील तापमानाचा पारा गेला उच्चांकी
पुणे : गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने शहरातील तापमान घसरले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याने अंगाची लाहीलाही हाेत आहे. कोरेगाव पार्कात पारा तब्बल ४२ अंशांवर पोहोचला. चार दिवसांत तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शहरात बुधवारी कमाल तापमान शिवाजीनगर येथे ४०, तर कोरेगाव पार्कात ४२.३ अंश हाेते. त्याखालोखाल वडगावशेरी ४१.९, चिंचवड ४१.५, मगरपट्टा ४०.८, पाषाण ३९.१ इतके होते. जिल्ह्यात शिरूर येथे सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे नागरिक शहरात दुचाकीवरून फिरतानाही छत्रीचा वापर करताना दिसले.