शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सांगा ना, मी निवडून येईन का? ज्योतिषांकडे वाढल्या उमेदवारांच्या चकरा; बुधवारी मतपेटीत बंद हाेणार भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 15:25 IST

लढत अधिक चुरशीची होणार असल्याने आपण निवडून येऊ का? याची चिंता उमेदवारांना भेडसावू लागली आहे.

पुणे : मी निवडून येईन का? माझ्या निवडीला वातावरण अनुकूल आहे का? मी जिंकलो तरी मला मंत्रिपद मिळेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी उमेदवारांची पावले हळूहळू ज्योतिषांकडे वळू लागली आहेत. लढत अधिक चुरशीची होणार असल्याने आपण निवडून येऊ का? याची चिंता उमेदवारांना भेडसावू लागली आहे.सर्वपक्षीय उमेदवारांचे भवितव्य बुधवारी (दि. २०) मतपेटीमध्ये बंद होणार आहे. मतदारांचा कौल नक्की कुणाकडे आहे, याबाबतचा अंदाज सध्यातरी कुणालाच बांधता येत नाहीये, अशी स्थिती आहे. शेवटच्या दोन दिवसात चित्र पालटू शकते, अशी एकंदर स्थिती आहे. त्यामुळे माझ्या ग्रहांची दिशा निवडणूक जिंकण्यास अनुकूल आहे का नाही? हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांच्या ज्योतिषांकडे चकरा सुरू झाल्या आहेत. अगदी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून तिकीट वाटप झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह, प्रचार कधी सुरू करायचा यासाठी ज्योतिषांचे सल्ले घेतले जात आहेत.नेत्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत येणाऱ्या अडचणी किंवा यशाबद्दल अंदाज हवा असतो. त्यासाठी कुंडलीचा अभ्यास केला जातो. बऱ्याच नेत्यांना वाईट नजर, शत्रुत्व किंवा राजकीय अडथळ्यांपासून बचावासाठी ज्योतिषांकडून रत्न, यंत्र, मंत्र किंवा हवन करण्याचा सल्ला दिला जातो. लोकांना नेत्यांची "धार्मिक आणि आध्यात्मिक" बाजू दाखवण्याचा हा एक मार्ग असतो. यातून त्या नेत्यांबद्दल लोकांमध्ये श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतो. राजकारणात नव्याने पदार्पण करणारे नेते अनेकदा ज्योतिषांचा सल्ला घेऊनच राजकारणात आपली पावले टाकत आहेत.

निवडणुकीमध्ये अनेक नेते मंडळी आपले राजकीय भविष्य पाहण्यासाठी येतात. यात त्यांना तिकीट मिळणार की नाही? यापासून मी निवडून येणार की नाही, अशा अनेक प्रश्नांवरील उपाययोजना विचारण्यासाठी येतात. राजकीय नेत्यांचे ध्येय हे निश्चित असते.- राजेंद्र दुगड, ज्योतिषी खास निवडणुकीच्या काळात जास्तकरून नेते मंडळी आपल्या राजकीय जीवनात होणाऱ्या हालचालींची माहिती घेण्यासाठी येतात. नेत्यांच्या हातावरून त्यांना येणारे यश-अपयश आणि उपाययोजना सांगितल्या जातात. त्यातून दशा, महादशा, ग्रहण हवन, देवी उपासना करण्यास सांगितले जाते.- प्रसाद पंडीत जोशी, ज्योतिषी

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024