कोरोना काळातही शिक्षकांचे काम प्रेरणादायी : सविता पऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:10+5:302021-02-05T05:09:10+5:30
शिरूर तालुका पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेतर्फे स्व.धर्मराज करपे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय ...

कोरोना काळातही शिक्षकांचे काम प्रेरणादायी : सविता पऱ्हाड
शिरूर तालुका पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेतर्फे स्व.धर्मराज करपे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या समारंभात त्या बोलत होत्या. संघटनेचे विभागीय अध्यक्ष सोपानराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुणगौरव सोहळ्यास माजी राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत, जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे, नामदेव गायकवाड, संजय वाघ, कार्याध्यक्ष शहाजी पवार, वसंत कामथे, उमेश देशमुख, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब दुर्गे, शशिकांत गावडे,,पतसंस्थेचे सभापती संतोष शेळके,गुनाटच्या सरपंच दीप्तीताई कर्पे आदी उपस्थित होते.
आपल्यातील एका आदर्श शिक्षकाची आठवण म्हणून संघटना चांगले काम करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान करते, असे उदाहरण दुर्मिळ असल्याचे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेव दुर्गे, सूत्रसंचालन ज्ञानेश पवार, तर आभार मानसी थोरात यांनी मानले.
पुरस्काप्राप्तींची नावे
आदर्श शाळा... वसेवाडी, कारकूडवस्ती.
शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून (प्रथम), ओम वाबळे, अनिशा ढमढेरे (पाचवी)
भूमिका चौधरी,
पराग घोडेकर (आठवी)
जगन्नाथ कदम. (जीवनगौरव ), विश्वास सोनवणे (आदर्श केंद्रप्रमुख), संदीप वाघोले (साहित्यरत्न), नितीन बारवकर (पत्रकारिता), शिवाजी पावसे, नितीन ताकवणे (कला व अध्यात्म),
राजेंद्र जोरी,अंजली कोळपकर (निवेदन), नारायण करपे (कलारत्न), संतोष वेताळ,सचिन पवार राजू झावरे, पूर्वा मोरे (तंत्रस्नेही शिक्षक),अंजना चौधरी, सुनीता टोणगे,सुनील गाडे, अशोक धुमाळ, अरुण गांजे (आदर्श कार्यकर्ता),शैलेश बोऱ्हाडे, विलास खैरे, विजया चव्हाण, दत्तात्रय घाडगे, राजेंद्र साळे, सुप्रिया भोर, यशवंत गाडीलकर, सुकन्या धुमाळ, नंदिनी शिर्के, सविता भोगावडे, राजाराम जाधव, निजाम शेख, श्यामराव इंदोरे(आदर्श शिक्षक ).
२८ तळेगाव ढमढेरे
पुरस्कार प्राप्त शिक्षक केंद्रप्रमुख व मान्यवर.