शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

‘टीडीएस’ बुडविणा-यांना तुरुंगात टाकणार, प्राप्तिकर आयुक्त, आगाऊ कर न भरणा-यांवरही कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 4:35 AM

टीडीएसची कपात करूनही त्याचा भरणा न करणा-या आस्थापकांना तुरुंगात जावे लागेल. या शिवाय आगाऊ करभरणा करण्याचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याने, अशा करदात्यांना डिमांड नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : टीडीएसची कपात करूनही त्याचा भरणा न करणा-या आस्थापकांना तुरुंगात जावे लागेल. या शिवाय आगाऊ करभरणा करण्याचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याने, अशा करदात्यांना डिमांड नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.प्राप्तिकर विभागाच्या कामगिरीची माहिती देताना शुक्ला म्हणाले, विभागात तब्बल ५ हजार आस्थापना टीडीएसची कपात करूनही, त्याचा भरणा सरकारकडे करीत नाहीत. टीडीएसची रक्कम ही सरकारची आहे. पुण्यातही एक बांधकाम व्यावसायिक दिवाळखोर झाला आहे. त्याने कर्मचाºयांची टीडीएसची रक्कम कापलेली आहे. मात्र, त्याचा भरणा केलेला नाही. अशा सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी, अगदी प्रसंगी तुरुंगात टाकावे, असे आदेश अधिकाºयांना आहेत.ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असेल, त्यांना दहा टक्क्यांप्रमाणे ५ हजार रुपये करभरणा करणे आवश्यक आहे. तीन लाखांवर उत्पन्न असणाºया सर्व व्यक्ती अगाऊ कर भरण्यासाठी पात्र ठरतात. आगाऊ कर भरण्याची मुदत १५ सप्टेंबरला संपत आहे. या मुदतीत कर भरणा न करणाºया व्यक्तींना डिमांड नोटीस पाठविण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना व्याज आणि दंडाच्या कारवाईलादेखील सामोरे जावे लागू शकते, असेही शुक्ला यांनी सांगितले.नोटाबंदीनंतर वाढले करदातेनोटाबंदीनंतर पुणे विभागातील २४ जिल्ह्यांत मिळून, तब्बल ८ लाख ४४ हजार नवीन करदाते वाढले आहेत, तसेच ११ सप्टेंबर अखेरीस थेट कर उत्पन्नातून १४,४५२ कोटी, ४० लाखांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण २० टक्क्यांनी अधिक आहे. नोटाबंदीनंतर करदात्यांनी जाहीर केलेली संपत्ती, प्राप्तिकर विभागाने केलेली कारवाई आणि फायदा कळण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल.मोठ्या रक्कमेचे व्यवहार, विदेशी यात्रा, वैद्यकीय उपचारांवर होणारे खर्च, खात्यामध्ये जमा होणारी रक्कम, मालमत्ता हस्तांतरण आणि बक्षीस पत्र अशा विविध व्यवहारांवर प्राप्तिकर विभागाचे लक्ष राहणार आहे. त्याची छाननी करण्याचे काम सुरू असून, त्यानंतर कारवाई होईल.- ए. सी. शुक्ला, मुख्य प्राप्तिकर आयुक्त, पुणे विभाग

टॅग्स :Governmentसरकार