पुण्यातील तळजाई वसाहतीत फाडले गाड्यांचे कव्हर, एकूण ४२ गाड्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:01 PM2017-12-27T12:01:14+5:302017-12-27T12:03:17+5:30

वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच आज (बुधवार, दि. २७) सकाळी तळजाई वसाहतमध्ये दुचाकी आणि रिक्षा असे एकूण ४२ गाड्याचे सीट कव्हर फाडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

tatter vehicle cover In Taljai colony of Pune, a total of 42 vehicles damage | पुण्यातील तळजाई वसाहतीत फाडले गाड्यांचे कव्हर, एकूण ४२ गाड्यांचे नुकसान

पुण्यातील तळजाई वसाहतीत फाडले गाड्यांचे कव्हर, एकूण ४२ गाड्यांचे नुकसान

googlenewsNext

सहकारनगर : वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच आज (बुधवार, दि. २७) सकाळी तळजाई वसाहतमध्ये दुचाकी आणि रिक्षा असे एकूण ४२ गाड्याचे सीट कव्हर फाडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. तर रिक्षाचे हुडदेखील पाडण्यात आले. पहाटे हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 
तळजाईमधील एकता मित्र मंडळ जवळ ही घटना आहे. फिर्यादी विठल चव्हाण यांची रिक्षा एमएच १२ एफझेड ५९९६ ही गाडी विणकर सभागृहाजवळ सापडली. तिचा स्विच बंद केला होता. रिक्षा पळवून नेण्याचा प्रयत्नत केला गेला होता. 

या आधी अशा घटना परिसरात घडल्या होत्या. मात्र यावेळी याचे प्रमाण खूपच जास्त आहे. ४० पेक्षाही जास्त गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे.
- दादा लोंढे, अध्यक्ष, एकता मित्र मंडळ


या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
- दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर

Web Title: tatter vehicle cover In Taljai colony of Pune, a total of 42 vehicles damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे