पुणे :अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून आमच्याकडे नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्याची दखल घेवून आम्ही नाना पाटेकर यांना नोटीस पाठविली. त्यावर त्यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरणही पाठविले होते. मात्र त्यानंतर दत्ता यांनी महिला आयोगासमोर येणे गरजेचे होते. मात्र, त्या अजूनही महिला आयोगाकडे आल्याच नाहीत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. तनुश्री दत्ता यांनी मी टू प्रकरणी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आक्षेप नोंदविले होते. याच विषयावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली. अभिनेत्री तनुश्री दत्ता मिटू प्रकरणी पाटेकर यांच्यावर आरोप केल्याने मोठ्या प्रमाणावर आश्चर्य व्यक्त केले होते. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता
तनुश्री दत्ता महिला आयोगासमोर आल्याच नाहीत : विजया रहाटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 15:27 IST
तनुश्री दत्ता यांनी मीटू प्रकरणी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आक्षेप नोंदविले होते.
तनुश्री दत्ता महिला आयोगासमोर आल्याच नाहीत : विजया रहाटकर
ठळक मुद्देतनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी राजकीय दबाव वापरुन क्लिन चिट मिळविल्याचा केला आरोप