शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा; शरद पवार मात्र बारामतीत कुस्तीपटुंचे डाव पाहण्यात मग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 20:09 IST

अजित पवार यांच्या कार्यालयाने प्रसिध्दीपत्रक जाहिर केल्यावर या चर्चांना पुर्णविराम

बारामती : राज्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याच्या, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे राजकीय डाव प्रतिडाव सुरु असल्याची चर्चा रंगली असतानाच सोमवारी(दि १७) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र बारामतीत कुस्तीपटुंचे डाव पाहण्यातच रमल्याचे चित्र दिसून आले.

बारामती येथे अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आंतराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान भरविले आहे. त्यासाठी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास शरद पवार  या कुस्त्यांच्या मैदानात  पोहचले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सोमवारी(दि १७) पुणे जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द झाल्याच्या चर्चेने ,तसेच या पार्श्वभुमीवर भाजपचे वरीष्ठ नेते दिल्लीत गेल्याच्या या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अजित पवार यांच्या कार्यालयाने प्रसिध्दीपत्रक जाहिर केल्यावर या चर्चांना पुर्णविराम मिळाला. अजित पवार यांच्या कार्यालयाने जाहिर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार सोमवारी अजित पवार यांचा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. ते मुंबईतच असून मंगळवारी(दि १८) विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत, कार्यालयाचे कामकाज नियमित सुरु राहणार आहे. मंगळवारी अजित पवार  आमदारांची बैठक बोलविल्याच्या बातम्या पुर्ण असत्य आहेत. आपण कोणतीही बैठक बोलावली नसल्याबाबत प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यानंतर  या चर्चांना पुर्णविराम मिळाला.

दरम्यान सोमवारी(दि १७) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सासवड येथील मेळाव्याला संबोधून माळेगांव(ता.बारामती) मध्ये पोहचले. त्यानंतर माळेगांव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या सभेला पवार उपस्थित राहिले. त्यानंतर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शरद पवार बारामती येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात पोहचले.कुस्ती हा खेळ पवार यांच्या आवडीचा असल्याने पवार मैदान पाहण्यातच रमुन गेल्याचे चित्र सोमवारी सायंकाळी दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस