सोशल मीडियावर महिलेशी बोलणे पडले महागात; सायबर पोलिस असल्याचे सांगत लुटले
By नितीश गोवंडे | Updated: August 18, 2023 19:01 IST2023-08-18T19:00:14+5:302023-08-18T19:01:01+5:30
याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे...

सोशल मीडियावर महिलेशी बोलणे पडले महागात; सायबर पोलिस असल्याचे सांगत लुटले
पुणे : सोशल मीडियाच्या सहाय्याने दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. अशाच एका प्रकरणात पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय व्यक्तीला सोशल मीडियावरून एका अनोळखी महिलेचा फोन आला. संबंधित महिलेने गोड बोलत वारजे माळवाडी येथील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराला भेटण्यास बोलवले. मात्र त्या हॉटेलवर तक्रारदार आल्यानंतर त्याला सायबर पोलिस असल्याचे सांगत लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
राजन ज्ञानेश्वर कोल्हे (४६. रा. रावेत) असे तक्रारदाराचे नाव असून हा प्रकार १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वारजे माळवाडी येथील एका हॉटेलमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने सोशल मीडियाद्वारे फोनवर कोल्हे यांना भेटण्यासाठी बोलवले. कोल्हे संबंधित हॉटेलमध्ये गेले असता तेथे अनाेळखी दाेघांनी आपण सायबर पोलिस असल्याचे त्यांना सांगितले. तसेच तु मुलींना ट्रॅप करताे, तुझी चाैकशी करायची असल्याचे सांगून चाैकीला चल म्हणत, परिसरातील एका एटीएम सेंटरला घेऊन गेले. तेथे त्यांनी कोल्हे यांच्या एटीएमधून ५३ हजार ५०० रुपये काढून घेत पोबारा केला.
याप्रकरणी कोल्हे यांनी वारजे पोलिसांकडे मनिषा जी नावाचे सोशल मीडिया अकाऊंट आणि दाेन अनाेळखी व्यक्ती यांच्या विराेधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वारजे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओलेकर करत आहेत.