शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

मावळ तालुक्यात १ लाखाची लाच घेताना तलाठ्यासह तिघे जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 8:22 PM

खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात-बाऱ्यावर करण्यासाठी २ लाख २० हजार रुपयांची केली होती मागणी

ठळक मुद्देसजा कार्लेचा तलाठी अटकेत : मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईलोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुणे : मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. या व्यवहारांची सात-बाऱ्यावर नोंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली जात असल्याचे मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्ले येथे केलेल्या कारवाईत निष्पन्न झाले. खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात-बाऱ्यावर करण्यासाठी २ लाख २० हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारताना कार्ल्याचा तलाठी व त्याच्या दोन साथीदारांना पकडले आहे. धनश्याम शंकर सोमवंशी (वय ४३, रा. सजा कार्ले, ता. मावळ) असे या तलाठ्याचे नाव आहे. गणेश गोपीनाथ वायकर, अविनाश सुनील देवकर (दोघे रा. कार्ले, ता़ मावळ) या दोन खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.याबाबत मुंबई येथील तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारदारांनी कार्ले येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीची नोंद सात-बाऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी तलाठी सोमवंशी याने त्यांच्याकडे २ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याची तक्रार तक्रारदारांनी मुंबई कार्यालयात केली होती. त्याची पडताळणी ६ मार्च रोजी करण्यात आली. त्यात तलाठी सोमवंशी लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुंबईचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तक्रारदारासह कार्ले येथे आले. त्यांनी गुरुवारी सापळा रचला. तलाठ्याच्या वतीने १ लाख रुपये घेताना गणेश वायकर याला पकडण्यात आले. पडताळणीत अविनाश देवकर यांचेही नाव असल्याने त्याच्यासह तलाठी सोमवंशी यालाही पकडण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.०००

टॅग्स :mavalमावळAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCorruptionभ्रष्टाचार